अन् बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचं नावच विसरले… गटनेता निवडताना काय घडलं?

Chandrashekhar Bawankule on Devendra Fadnavis : गटनेता निवडीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला बावनकुळे विसरले. विधिमंडळ परिसरात होत असलेल्या भाजपच्या गटनेता निवडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर बातमी...

अन् बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचं नावच विसरले... गटनेता निवडताना काय घडलं?
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 12:21 PM

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. विधिमंडळात आज भाजपच्या गट नेता निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या निरीक्षक निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मंचावरील सगळ्यांचा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला चंद्रशेखर बावनकुळे विसरले. मात्र नंतर पुढे बोलत असताना बावनकुळे यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी ही चूक सुधारली.

चंद्रशेखर बावनकुळेंनी चूक सुधारली

मी आधीच सांगितलं हा ऐतिहासिक दिवस आहे. माफ करा मी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करायचं राहून गेलं. फडणवीस उपस्थित आहेत. खाली असल्यामुळे राहून गेलं. आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला. आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, भाजपचे आपण सर्व उमेदवार होतो. आता आमदार आहोत, असं बावनकुळे म्हणाले.

तुम्ही सर्वांनी मोदींच्या मार्गदर्शनात आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण ऐतिहासिक महाविजय व्हावा यासाठी प्रचंड ताकद लावली. प्रचंड मेहनत केली. मोदींच्या नेतृत्वात आपण डबल इंजिन सरकार पुढे नेऊ शकतो, महाराष्ट्र हे देशातील सर्वोत्तम राज्य होऊ शकतं. हे जनता आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं. प्रचंड यश दिले, असं बावनकुळे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीबाबत बावनकुळे काय म्हणाले?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भव्य यश मिळालं. यावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी महायुतीसोबत निवडणूक लढली. या महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचं आभार मानलं पाहिजेत, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

भाजप आणि महायुतीवर जनतेने विश्वास टाकला. आपण १४९ सीट लढवल्या. आतापर्यंतच्या भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठं यश म्हणजे १३२ जागा निवडून आल्या. आपण आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादीच्या ४१ आल्या. आपल्याला ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा दिला. भाजपचा १३७ आमदारांचा गट असेल. आपल्याला पाच आमदारांचा पाठिंबा आहे. मोठं यश आहे. जनतेचा विश्वास आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.