आता 18 तास काम चालतं,आधी मात्र…; चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका आहे. काय म्हणालेत पाहा...

आता 18 तास काम चालतं,आधी मात्र...; चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 1:21 PM

भिवंडी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचं (CM Eknath Shinde) कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार 18 तास काम करतं. एक काळ होता की फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होतं. 18 महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हतं, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ते भिवंडीत बोलत होते.

आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असंही सरकार महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारं सरकार सत्तेत आलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी करतोय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचं सरकार आहे. लोकांची कामं केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. अता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असंही बावनकुळे म्हणालेत.

पक्षाच्या वाढीसाठी विविध ठिकाणी दौरा करतोय. ठाणे जिल्हा ग्रामीणचा संघटनात्मक दौरा सध्या करतोय. राज्याचा 80 टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत 45 जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. राज्यात 25 लाख युवा वॉरीअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे 7 कोटी लाभार्थी असून त्यापैकी 2 कोटी लाभार्थी मोदींजींना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत 35 लाख महिलांनी पत्रं दिली आहेत, अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत धान्य देण्याची योजना सुरू झाली आहे. रेशनच्या दुकानात राज्यातील 7 कोटी 10 लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.13 कोटींच्या महाराष्ट्रात 7 कोटींना मोफत धान्य मिळणार आहे.हे जनतेसाठी काम करणारं हे सरकार आहे, असंही बावनकुळे म्हणालेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.