“विरोधकांची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीची ‘ही’ कृती फुसका बॉम्ब!”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मविआवर टीकास्त्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

विरोधकांची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीची 'ही' कृती फुसका बॉम्ब!, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मविआवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 1:12 PM

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून ‘बॉम्ब’वॉर सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करताना ‘बॉम्ब’चा उल्लेख केला आहे.   शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कराव जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे.

अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो अधिवेशाच्या पहिल्या दिवशीच आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

विरोधकांचे वीस पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे. 184 च्या वरती मतदान मिळतील. भावनात्मक पद्धतीने मिस अंडरस्टँडिंग करणंच विरोधकांचं काम आहे. आणि तेच हे लोक करत आहेत. सगळे विरोधक हे विधानभवनात राजकीय बोलले. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं बावनकुळे म्हणालेत.

अखंड महाराष्ट्राच्या विकास कसा होईल. सरकारच्या वतीने जनतेसाठी काय करता येईल. विदर्भासाठी काय करता येईल. मराठवाड्यासाठी काय केलं पाहिजे. यावर चर्चा अपेक्षित होती. तसं झालं नाही. विरोधक टाइमपास करतात. वेळ खराब करतात. विरोधक दुतर्फी भूमिका घेत आहेत, असंही बावनकुळे म्हणालेत.

विधानपरिषदमध्ये विरोधकांमध्ये एकमत नाही. अडीच वर्ष उद्धव यांच्या सरकारने योग्य काम केलं नाही. धानाच्या बोनस मिळावा म्हणून नाना पटोले यांनी अडीच वर्ष अजित पवारासमोर नाक रगडला पण हाती काहीच मिळालं नाही.

राष्ट्रवादीची वेगळी भूमिका, उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसतात. राजकीय भाषणे सुरू आहेत. विदर्भ आणि महाराष्ट्र विकासाबाबत काहीच बोलले नाही. महाराष्ट्र जनता भावनिक तुमचे शब्द ऐकणार नाही. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

हीराबेन यांचं जाणं संपूर्ण भारतासाठी दु:खद बातमी आहे. ज्या मातोश्रींनी विश्वगुरू युगपुरुष नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म दिला. त्यांचं जाणं माझ्यासह अनेकांसाठी मनाला वेदना देणारं आहे. नरेंद्र मोदी यांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो एवढीच प्रार्थना, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.