राज ठाकरेंनी भेट का घेतली? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण…
राज ठाकरे आपल्याला भेटायला का आले होते, यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नागपूर : राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पक्षविस्तारासाठी आणि पुढची रणनिती ठरवण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यावर आता बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे माझे मित्र आहेत. ते दिलदार व्यक्ती आहेत म्हणून माझी त्यांच्यासोबत पक्की मैत्री आहे. मी त्यांना निमंत्रण दिलं होतं. नागपूरला आल्यानंतर तुम्ही आमच्या घरी या म्हणून… त्यामुळे ते आले होते. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं बावनकुळे म्हणाले आहेत.