कसब्यापासून काश्मीरपर्यंत चर्चा, देशात महाविकास आघाडीची लाट? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात?

| Updated on: Mar 04, 2023 | 2:21 PM

कसब्यात एक सुप्त लाट होती. कसब्यात प्रचारासाठी फिरताना मलाही ती जाणवली, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

कसब्यापासून काश्मीरपर्यंत चर्चा, देशात महाविकास आघाडीची लाट? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कसब्याच्या (Kasba) पोट निवडणुकीत (By Poll Election) निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव अवघ्या महाराष्ट्रात चर्चिला जातोय. विधानपरिषद निवडणुकानंतर विधानसभा पोट निवडणुकीतील भाजपची ही हार नव्या परिवर्तनाची नांदीच आहे, अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीलाही या विजयामुळे मोठं बळ मिळालंय. आता पुढच्या प्रत्येक निवडणुकीत राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता भाजपाच्या विरोधात उभी राहील, असेही म्हटले जात आहे. पण भाजपकडून या निवडणुकीचं विश्लेषण नेमकं कसं केलं जातंय, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसब्यातील पराभवावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. कसब्यात एक सुप्त लाट होती. कसब्यात प्रचारासाठी फिरताना मलाही ती जाणवली, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

सुप्त सहानुभूती…

कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यामागे एक सुप्त सहानुभूती होती. कारण यापूर्वी ते दोनदा विधानसभेत निवडणूक लढले होते. तेथील जनतेत मीसुद्धा प्रवास केला आहे. धंगेकरांनी दोनदा निवडणूक लढल्यामुळे त्यांनाच यावेळी मत द्यावं, असा जनतेचा कौल होता आणि तो आम्ही मान्य केला. यातून पूर्ण महाराष्ट्राचं चित्र दिसतंय, हे म्हणणं चुकीचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चिंचवमध्ये 51 टक्केची लढाई …

चिंचवड पोट निवडणुकीत आम्ही 51 टक्क्यांची लढाई जिंकल्याचं बावनकुळे म्हणाले. कसब्यात आम्ही चार टक्के मागे पडलो. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही चुकलं असेल तर ते सुधारू, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय.

देशात बदलाचा मूड?

कसबा निवडणुकानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात बदलाचा मूड आहे, असं म्हटलं जातंय. यावरून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ पवार साहेबांनी तीन राज्यांचे निकाल पहावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. तीन राज्य हातून गेले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी शरद पवार म्हणाले.

हा धंगेकरांचा विजय..

चिंचवडमध्ये भाजपचा नव्हे उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय असल्याचं संजय राऊत म्हणालेत. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनीही कसब्यातील महाविकास आघाडीवर बोट ठेवलं. इकडे धंगेकर यांचा विजय आहे. कसब्यात एक सुप्त सहानुभूतीची लाट आहे. कसब्यात भाजप-काँग्रेस लढाईच झाललेली नाही. तेथे रासने हे पहिल्यांदा लढले. धंगेकर तीनदा लढले. कसब्याचा विजय मविआचा नाही, तो धंगेकराचा विजय आहे. धंगेकर यांची मोठी लाट तेथे होती. एका निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देश जिंकल्याची भावना सोडून द्यावी, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय.