चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणासोबत होळी साजरी केली? संजय राऊतांकडून काय अपेक्षा?

शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मी उद्या विधानपरिषदेत विनंती करणार असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणासोबत होळी साजरी केली? संजय राऊतांकडून काय अपेक्षा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 2:27 PM

गजानन उमाटे, नागपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज नागपुरात (Nagpur) त्यांच्या लहानपणापासूनच्या मित्रांसोबत होळी साजरी केली. दरवर्षी ते इथेच येऊन होळी साजरी करतात. आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे, आजच्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करून महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. कालपासून राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेकतऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मी उद्या विधानपरिषदेत विनंती करणार असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

विरोधकांना काय विनंती?

आज होळीच्या विरोधकांना काय विनंती कराल, असे विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी विरोधकांना विनंती करेल की आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हा राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे… संजय राऊतांकडून अपेक्षा करेल की त्यांनी उद्यापासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं..

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू..

उद्या विधान परिषदेमध्ये सरकारला विनंती करेल की, आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं त्यांना मदत मिळावी यासाठी मी भारतीय जनता पक्षाकडून सरकारला त्यांना मदत संदर्भात विनंती करणार आहे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात पुढच्या काळात आहेत. राजकारणात आमचं कामच आहे पक्ष वाढवणं, संघटन मजबूत करण्याची माझी जबाबदारी आहे, आजच्या दिवशी नाना पटोले आणि इतर सर्व पक्षाचे अध्यक्ष यांनी मनभेद मात्र विसरून महाराष्ट्रासाठी काम करण्याची गरज आहे, अपेक्षा आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

राजकीय गुलाल कुणाला लावाल?

आजच्या दिवशी कुणाला राजकीय गुलाल लावाल, या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावध उत्तर दिलंय. मी सर्वच पक्षाच्या नेत्यांना राजकीय गुलाल लावेल. सध्या राज्यात जे टोकाचं राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासाने पुढे गेला पाहिजे, आम्ही आज आमच्यापासून ही सुरुवात करत आहे सर्वांनी त्याला साथ द्यावी, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.