लोकांच्या तक्रारी जागेवर सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार
पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.
वर्धा : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशा जनतेच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना दिसायला लागल्या आहेत. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule Wardha) यांनी पदभार सांभाळताच जनसंवाद जनता दरबार सुरू केला. पालकमंत्री (Chandrashekhar Bawankule Wardha) येणार हे कळताच शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या नागरिकांच्या समस्या गाडीतून उतरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर एकूण घेतल्या. त्यापैकी काहींचे निवारण करण्यात आले.
गर्दी वाढलेली दिसल्यांनातर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी साधारण 150 पेक्षा जास्त तक्रारी आजही नोंदविण्यात आल्या.
जनतेच्या तक्रारी पहिल्याच पायरीवर सोडवल्या गेल्या तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी येण्याचे प्रमाण कमी होईल आणि जनतेला लवकर दिलासा देता येईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी रोज दोन तास राखीव ठेवावे, तक्रारी आपल्याच स्तरावर निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
अगदी छोट्या-छोट्या तक्रारींसाठी लोकांनी पालकमंत्र्यांकडे येणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या पातळीवर सदर तक्रारी सुटणे आवश्यक आहे. आलेल्या तक्रारींवर कोणताही मार्ग निघत नसल्यास संबंधित व्यक्तीला तसे लेखी कळविल्यास पुन्हा तक्रार घेऊन येणार नाही. तसेच तक्रारींचे निराकरण तात्काळ केल्यास नागरिकांना समाधान मिळेल, असंही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं.