मशाल सध्या पंजाच्या हाती, तेल कोण टाकतंय? ठाकरे यांना जिव्हारी लागणारा बाण कुणाचा?

वरळी मतदार संघाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंनी वरळीत काहीच कार्यक्रम घेतले नाहीत. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतले तरी त्याला किती लोक येतील, याचीही त्यांना भिती आहे.

मशाल सध्या पंजाच्या हाती, तेल कोण टाकतंय? ठाकरे यांना जिव्हारी लागणारा बाण कुणाचा?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 1:45 PM

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची मशाल पंजाच्या हाती दिलीय. त्या हातात घड्याळ आहे आणि त्यात तेल शरद पवार (Sharad Pawar) टाकतायत. त्यामुळे ती मशाल कुठपर्यंत चालेल, हे सांगता येत नाही, अशी जिव्हारी लागणारी टीका भाजप नेत्याने केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळीवर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केलंय. या अनुशंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. ते म्हणाले, ‘ मशाल त्यांनी कुणाच्या हातात दिलीय? पंजाच्या हातात. हाताला घडी आहे. त्यात तेल शरद पवार टाकतात. त्यामुळे ती मशाल किती टिकतेय, हे सांगता येत नाही.

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलेली मशाल आहे. त्यामुळे मला वाटतं, ज्या पद्धतीने त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात स्वीकारलाय. घड्याळ स्वीकारलाय. वरळीतील जनता ही 51 टक्के मतं भाजपाला देईल….

वरळीत भाजपाचा उमेदवार कोण असेल, लवकरच आमचा संसदीय बोर्ड जाहीर करेल,असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

वरळी मतदार संघाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंनी वरळीत काहीच कार्यक्रम घेतले नाहीत. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतले तरी त्याला किती लोक येतील, याचीही त्यांना भिती आहे. अजूनही ते भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत, सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसतात. त्यामुळे ते वरळीत कार्यक्रम घेण्याची हिंमत करत नाहीत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

लोकसभा निवडणुकांसाठी बारामती मतदार संघावर तर विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघावर भाजप विशेष मेहनत घेत आहेत. आतापासूनच भाजपने येथे बड्या नेत्यांचे दौरे आयोजित केले आहेत.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.