आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेन- बावनकुळे
आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेनचं सरकार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेनचं सरकार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bwankule) म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बावचळले आहेत. त्यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. ते फक्त प्रसिद्धीसाठी टीका करत आहेत, असंही ते म्हणालेत. शिवसेना राहिली नाही हा तर उद्धव गट म्हणून शिवसेनेला त्यांनी संबोधलं आहे. मुंबई मधील सदा सरवणकर घटनेबाबत पोलीस योग्य ती कारवाई करतील, असंही बावनकुळे म्हणालेत.