काँग्रेसमध्ये लवकरच बदल होणार, पण केव्हा?; नाना पटोले यांनी सांगितलं
भाजपची परिस्थिती खूप अडचणीची आली आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या यात्रेला गेलो होतो. उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रचाराचा नारळ फोडायला तिथं सभा लावली होती, असा आरोप पटोले यांनी केला.
मुंबई : बाळासाहेब थोरात आणि काँग्नेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद झाला. या वादावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले. रायपूर येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर पक्षात काही बदल केले जातील. बच्चू कडू यांनी काँग्रेसचे (Congress) १५ आमदार फुटणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, कुणाच्या व वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पदयात्रा येत होती. तेव्हाही काही हौसीगौसींनी त्याठिकाणचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर चर्चा करण्याचं काही कारण नाही.
पंतप्रधान मुंबईत, महाराष्ट्रात येतात ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाणीव त्यांना मागच्या वेळी आले तेव्हा करून दिली होती. आता प्रश्न पुन्हा वाढले. राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न विचारले. अदानी बरोबर त्यांचे संबंध होते. किती कंत्राट त्यांना दिले. किती वेळा ते पंतप्रधानांच्या दौऱ्यात होते. यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. हे उत्तर त्यांना देणं भाग आहे, असंही पटोले यांनी म्हंटलं.
पंतप्रधानांनी याची उत्तरं दिले पाहिजे
पंतप्रधानांबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, लोकसभेत ते बोलत नाहीत. पण, बाहेर ते मन की बात बोलतात. जनतेच्या मनातलं त्यांना ओळखता येते असं ते म्हणतात. १४० कोटी लोकं माझ्यासोबत आहेत. असंही ते म्हणतात. या देशातला प्रत्येक माणूस ज्यांनी एलआयसीत पैसे भरले आहेत. बँकांमध्ये पैसे भरले आहेत. हे सगळं संभ्रमात आणि भयभित आहेत. त्याची उत्तरं पंतप्रधान मोदी यांनी दिली पाहिजे.
पंतप्रधान मोदी हे लोकसभेत बोलले नाहीत. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत. मुंबईत आज या प्रश्नांची उत्तर द्यावीत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडविणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी विनंती नाना पटोले यांनी केली.
फेरीवाल्यांना भाजपने फसविल्याचा आरोप
भाजपची परिस्थिती खूप अडचणीची आली आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या यात्रेला गेलो होतो. उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रचाराचा नारळ फोडायला तिथं सभा लावली होती, असं पटोले यांनी म्हंटलं.
मुंबईत मागच्या वेळा नरेंद्र मोदी येथे आले. तेव्हा लोकं कसं जमवायचे असा प्रश्न होता. पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना कर्ज देण्याचं आश्वासन दिलं. पण, काही लोकं मला भेटायला आले होते. ते म्हणाले आम्हाला भाजपनं फसविलं, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भाजपनं जनतेला फसविलं आहे. मुंबईतील जनता भाजपला मदत करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.