खंत, नाराजी अन् भविष्याचा वेध…; छगन भुजबळांच्या भाषणाने षणमुखानंदची सभा गाजवली
Chhagan Bhujbal Full Speech on NCP Foundation Day 2024 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त षणमुखानंद हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. छगन भुजबळांनी लोकसभा ते विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. वाचा...
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. यंदा पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरे होत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये वर्धापनदिन साजरा होत आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मुंबईत वर्धापनदिन होत आहे. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. त्याच सभागृहात अजित पवार गट वर्धापन दिन साजरा करत आहे. यावेळी पक्षातील विविध नेते आपलं मनोगत मांडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या सभेला संबोधित केलं. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. लोकसभा निवडणुकीत ठेच लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांचं भाषण
लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठेचं लागलेली आहे हे नाकारून चालत नाही. पुढे ठेचं लागणार नाही यासाठी विचार करायला पाहिजे. विकास-विकास जरूर करा. मुंबईत ज्या रस्त्यावर झालं तिथे काम सुरू त्यावरही बोला. केवढे पैसे मुंबईत खर्च केले. मुंबईत युतीचे सगळे येतील असं वाटलं. पियुष गोयल निवडून आले. मागेपुढे करत वायकर निवडणुन आले. लाखो कोटी रूपये आम्ही खर्च केलेलं आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकाचं भव्य काम उभं राहत आहे. हे दोन समाज आपल्याला सोडून बाजूला झाले. दलित , मुस्लिम समाज आपल्याला सोडून का गेले. आपण यांचा विचार करणार आहे की नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
सर्वांना सोबत घ्यावं लागेल- भुजबळ
400 पार असा प्रचार करण्यात आला संविधान बदलणार असा प्रचार झाला. मोदी साहेबांनी टीव्ही चँनेलवर 15 मिनिट सांगितलं पण त्यांचा परिणाम झाला नाही. 400 पार म्हणजे आपला बेडा पार असं लोकांच्या डोक्यात गेलं. मुस्लिम समाज आपल्यापासून दुरावला होता. विरोधी पक्षाचं काम आहे सत्ताधा-याचं नुकसान होईल असा प्रचार ते करत असतात. आता विधानसभेची निवडणुका आहे संविधान बदलण्याचं काम होणार नाही. विधानसभा संविधान बदलण्याच काम होत नाही. आपले मुस्लिम , ओबीसी , भटके , विमुक्त मतदार आपल्याला परत मिळावावे लागतील, असं छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. आपण ती मत घालवून जागा कशा निवडून येणार? युपीतही अश्या प्रकारचा प्रचार झालेला आहे. इंडिया आघाडी तिकडे पुढे गेल्याचं पाहियला मिळालं. आपण छत्रपती शाहू महाराजाचं नाव घेतो. कृती आपल्याला दाखवावं लागेल. आपण त्या मार्गातून जातो आहोत. आपल्याला सर्व मत आपल्याला घ्यावी लागतील, असं म्हणत भुजबळांनी सभेला संबोधित केलं.
मत पुछो हमसे वादा किया है…
ना हारूंगा ऐसा हमने वादा…, असं म्हणत भुजबळांनी भाषण थांबवलं.