राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही रुग्णालयात दाखल, उपचार सुरु
छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal hospitalized) उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal hospitalized ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal hospitalized) उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळांवर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये (jaslok hospital) उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. निवडणुकीच्या धावपळीत नेत्यांना तहान-भूक हरवून काम करावं लागलं. त्यामुळेच भुजबळांना त्याचा ताण जाणवतोय की काय असा प्रश्न आहे. छगन भुजबळ हे नाशिकमधील येवला मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात होते. त्यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला.
धनंजय मुंडेंही रुग्णालयात
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सुद्धा रात्री उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्यामुळे ते चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Dhananjay Munde Health Update) गेले होते. धनंजय मुंडेंच्या काही प्राथमिक तपासण्या रात्री उशिरा करण्यात आल्या. धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.