हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा, परत डोकं वर काढतायत, राणेंची जहरी टीका

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. 

हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा, परत डोकं वर काढतायत, राणेंची जहरी टीका
Chhagan Bhujbal_Narayan Rane
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 12:47 PM

रायगड : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हे भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. ते परत डोकं वर काढत आहेत”, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

आरक्षणाचा मुद्दा क्लियर

आरक्षणचा मुद्दा क्लियर झालेला आहे. मराठा आणि ओबीसीचा मुद्दा क्लियर केले आहे. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता 15 वर्ष काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, “महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही”.

आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा,  असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

मुंबई, महाराष्ट्र ताब्यात द्या

हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.

700 कोटी वाटा अन्यथा मोदींना सांगेन

कोकण माझं घर आहे घरी आल्यावर आनंद होतोच. आज कोकणात येताना प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील सोबत आहेत. मी पाहिला दौरा कोकणचा केला. या दौऱ्याचा अहवाल घेऊन मी दिल्लीत गेलो. तिकडून मदत मागितली, केंद्राने 700 कोटी रुपये पाठवले. मी परत पंतप्रधानांना सांगेन की तुम्ही दिलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही, असं नारायण राणे म्हणाले.

VIDEO : नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

संबंधित बातम्या 

OBC Reservation : छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर, देशातील बड्या वकिलाला भेटणार!   

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्ला

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.