उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश आनंदाची बाब : छगन भुजबळ

उर्मिला मातोंडकर जनसेवेसाठी शिवसेनेत येत असतील, तर चांगलं आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली

उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश आनंदाची बाब : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 12:36 PM

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ‘मातोश्री’वर अधिकृत पक्षप्रवेश करत आहेत. उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेना प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्या राजकारणात जनसेवेसाठी शिवसेनेत येत असतील, तर चांगलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) दिली. (Chhagan Bhujbal reacts on Urmila Matondkar joining Shiv Sena)

महाविकास आघाडी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक एकत्र लढवत आहे. आम्हाला विश्वास आहे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. राज्यभरात विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे.

“बॉलिवूड मुंबईतून हलणार नाही”

“मुंबईमधून बॉलिवूड हलवण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. मुंबईत गँगवॉर असताना हैदराबादला बॉलिवूड जाणार असल्याची चर्चा होती. मुंबईचे उद्योगधंदे गुजरातमध्ये यावेत, यासाठी तेव्हाच्या मुख्यमंत्री आनंदी पटेल यांनी प्रयत्न केले, पण जास्त गुंतवणूक महाराष्ट्रातच आली. कितीही प्रयत्न केले, दबाव आणला तरी बॉलिवूड मुंबईतून हलणार नाही” असा ठाम विश्वास भुजबळांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

“आरक्षण राहिले बाजूला आणि राजकारण सुरु”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी मागणी आतापर्यंत सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी केली आहे. सर्व पक्षांनी हीच भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, याला आमचाही पाठिंबा आहे. ओबीसींचे आरक्षण शाबूत ठेवा, या मागणीसाठी समता परिषद प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देत आहे. मराठा मोर्चा काढतात त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी मोर्चा काढणार आहेत. पण असे नको व्हायला” असं मत भुजबळांनी व्यक्त केलं.

“आरक्षण राहिले बाजूला आणि राजकारण सुरु झाल्याचं दिसत आहे. पण दुसर्‍याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्यांना विनंती करण्याचा अधिकार आहे” अशी भूमिका भुजबळांनी मांडली. (Chhagan Bhujbal reacts on Urmila Matondkar joining Shiv Sena)

संबंधित बातम्या :

उर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार, रंगिला गर्लच्या गौप्यस्फोटांकडे लक्ष

राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(Chhagan Bhujbal reacts on Urmila Matondkar joining Shiv Sena)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.