छगन भुजबळ 5 वर्षे चांगला असतो, कामं करतो पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असं विचारतात, भुजबळांकडून खंत व्यक्त

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. त्याबैठकीत विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित आहेत. OBC leader Meeting

छगन भुजबळ 5 वर्षे चांगला असतो, कामं करतो पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असं विचारतात, भुजबळांकडून खंत व्यक्त
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 1:54 PM

पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. त्याबैठकीत विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली. पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो, असं ते म्हणाले .(Chhagan Bhujbal said at the time of election people asked may caste addressing OBC Meeting)

ओबीसीचं कोण बघणार?

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत, हे सर्वांना माहित आहे. जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? ओबीसी खात्याची जबाबदारी पहिल्यांदाच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींची लढाई सुरु झाली,ती आजंही सुरुच आहे. आमचे अहवाल कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले, असं छगन भुजबळ म्हणाले.

27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं, त्यामुळे ओबीसींच्या विविध 56 हजार जागा संकटात आल्या आहेत. मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे चलावं इम्पेरीकल डेटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले.

भाजपच्या आंदोलनाचं स्वागत

आज भाजपचं ओबीसींसाठी आंदोलन आहे त्याचं मी स्वागत करतो. दोन चार शिव्या आम्हाला द्या पण तुम्ही ओबीसीवर बोला, असंही भुजबळ म्हणाले. पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. ओबीसींमध्ये कुठल्या जातीचा उमेदवार उभा राहिला तर इतर जाती समर्थन करत नाही ही परिस्थिती आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडची परिस्थिती वेगळी आहे, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आमदार बोलत नाही, कारण त्यांना मतदारसंघात जावं लागतं आणि मतं मागावी लागतात. चंद्रशेखर बावनकुळे मला येऊ भेटले आणि म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या अध्यादेशावर तुम्ही सही करु नका. 31 जुलै 2019 ला तो अध्यादेश काढला, ट्रीपल टेस्टला बाजूला सारुन अध्यादेश काढला होता.

इंपेरिकल डाटा हा कुणाच्या घरची संपत्ती नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय संपूर्ण देशासाठी लागू आहे. मी फडणवीस यांना फोन केला, देवेंद्रजी हे सर्व देशाला लागू आहे, तुम्ही केंद्राकडे जा आणि इंपेरिकल डेटा आणा. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं, असं भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ घाबरत नाही, खूप हातोडे झेलले आहे, लढायला तयार आहे. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं. मित्रांच्या कृपेने मी अडीच वर्षे आत गेलो होतो, असंही छगन भुजबळ म्हणाले.

संबंधित बातम्या:

तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

OBC Meeting | लोणावळ्यातील सर्वपक्षीय ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस

(Chhagan Bhujbal said at the time of election people asked may caste addressing OBC Meeting)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.