राज ठाकरेंकडे हजारो मतं, फायदाच होईल: छगन भुजबळ
सोलापूर: लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्रात तर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. मनसेने राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा मागितल्याची चर्चा असताना, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास फायदाच होईल, असं मत व्यक्त […]
सोलापूर: लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्रात तर नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. मनसेने राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा मागितल्याची चर्चा असताना, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास फायदाच होईल, असं मत व्यक्त केलं. ते सोलापुरात बोलत होते.
भुजबळ म्हणाले, “राज ठाकरे यांच्याशी जागावाटपबाबत काही चर्चा सुरु आहे की नाही याबाबतची माहिती मला नाही. मात्र राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास त्याचा फायदाच होईल. आम्हाला एक एक मताची गरज असताना, राज ठाकरे यांच्या मागे तर हजारो मते आहेत. ते मोदी सरकारच्याविरोधात असल्याने त्यांचा फायदाच होईल”
वाचा: महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?
भुजबळ यांनी हे वक्तव्य करुन राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत उघड समर्थन केलं.
“एक एक मतांचा फायदा निवडणुकीत होतो. राज ठाकरेंकडे तर हजारो मतं आहेत, त्यांचा फायदा निश्चित होईल. ते सुद्धा मोदींविरोधात बोलत आहेत, त्यामुळे त्यांचा फायदा होईल. मात्र त्यांनी जागा वगैरे मागितल्याची माहिती मला नाही” – छगन भुजबळ
मनसेने मुंबईची जागा मागितली?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाआघाडीत मनसेला 4 ते 5 जागा हव्या आहेत. त्यापैकी एक जागा मुंबईत हवी असल्याचं सांगण्यात येत आहे. ईशान्य मुंबई मतदार संघावर मनसेने दावा केला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या या मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. त्यांच्याविरोधात मनसेला निवडणूक लढवायची आहे. गेल्या निवडणुकीत आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. मात्र महाआघाडीत घेतल्यास ही जागा मनसेला हवी आहे. मनसेकडून महेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली होती.
संबंधित बातम्या
महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?
राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न
ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान
लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…
राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न