बीडमध्ये शरद पवार यांच्यासाठी भावनिक बॅनर, पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही; रोहित पवार यांनी अजित पवार गटाला फटकारलं
Rohit Pawar on Sharad Pawar : बीडमधील शरद पवार यांची सभा, अजित पवार गटाने लावलेले बॅनर अन् राज्यातील राजकीय स्थिती; काय म्हणाले रोहित पवार? अजित पवार यांच्या गटावर टीका करताना रोहित पवार नक्की काय म्हणाले? वाचा...
छत्रपती संभाजीनगर | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि रोहित पवार हे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. बीड शहरात या जाहीर सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेआधी रोहित पवार यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार गटाकडून यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तसंच आजची सभा दमदार होणार, स्थानिकांचा या सभेला चांगला प्रतिसाद मिळेल, असंही रोहित पवार म्हणालेत.
बीडमध्ये शरद पवारांसाठी भावनिक बॅनर लावले गेलेत. पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही, जो नेता 60 वर्षे एक विचार जपून राहिला त्याला अप्रत्यक्षपणे रिटायर व्हा अस सांगतायेत. सध्या महाराष्ट्राच राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे, असं रोहित पवार म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक जण मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. काहींनी कपडे शिवले होते त्यातील काहींनी जाळून टाकले तर काहींचं वजन वाढलं. एकंदरीतच त्या गटाचे वातावरण डिस्टर्ब झालं आहे आणि जेव्हा शरद पवार फिरतील तेव्हा यांची अवस्था तीच होईल, असं रोहित पवार म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक भाजपाचे आमदारान हजारो कार्यकर्त्यांना घेऊन गुजरातला पर्यटनाला गेले, महाराष्ट्रातील एखाद्या ठिकाणी का नाही गेल?, असं म्हणत आमदार प्रशांत बंब यांना रोहित पवार यांनी टोला लगावला आहे
1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा लोकांनी घड्याळाकडे बघितलं नाही, तर पवारांकडे बघितलं. बाजूला गेलेले लोक एक तास भाषण करतात. तर 60 टक्के वेळ शरद पवारांचं नाव घेतात त्या लोकांकडे सुद्धा साहेबांचा फोटो लावण्याशिवाय पर्याय नाही, असं रोहित पवार म्हणालेत.
काल विद्यापीठ गेलो तसा आज अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी आलो आहे. तर इथे नाष्टा करायला अनेक मुलं आहेत. गेल्या काही वर्षांत युवांबद्दल कोणी काही बोलत नाही. त्यामुळे युवकांमध्ये खूप खदखद आहे. राज्यात अनेक उद्योग येत होते. पण आता उद्योग येत नाहीत. युवांचं मत या सरकारविरोधात आहे. युवांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. अधिवेशनात आमचे मुद्दे मांडायला पाहिजे होते. विरोधकांनी मुद्दे मांडले. पण गोल गोल उत्तर दिली गेली, असं या तरूणांचं म्हणणं आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
सध्या चर्चा एकच आहे मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार? हा नेता नाराज तो नेता नाराज एवढंच सुरु आहे. सरकार या मुलांबद्दल कोणतीही चर्चा करायला तयार नाही. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना जेवायला पैसे नाहीत. म्हणून मुलं एक वेळच्या नाष्ट्यावर तरूण दिवस काढत आहेत, असंही रोहित यांनी सांगितलं.