संजय राऊत निवडणूक लढवणार असतील, तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी, कारण…; शिंदे गटाच्या आमदाराची प्रतिक्रिया

Sanjay Shirsat on Sanjay Raut Loksabha Election 2024 : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणाच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं, म्हणाले, ही आमच्यासाठी आनंदाची बातमी!, दिलीप वळसे पाटील यांच्या विधानावर काय म्हणाले? पाहा...

संजय राऊत निवडणूक लढवणार असतील, तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी, कारण...; शिंदे गटाच्या आमदाराची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 1:32 PM

छत्रपती संभाजीनगर | 21 ऑगस्ट 2023: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली. खुद्द संजय राऊत यांनीही पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू, असं म्हटलं. त्यावर आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत वेडा माणूस आहे, सकाळी भुंकण्यासाठी काहीही मुद्दे घेत असतो. संजय राऊत निवडणूक लढवणार असतील. तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एकदा त्यांना त्यांची औकात कळू द्या…, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत. तसंच संजय राउतचे डिपॉझिट जाऊ नये म्हणजे झालं, अशी टिपण्णीही संजय शिरसाट यांनी केली आहे.

ठाण्यातील रूग्णालयात एकाच दिवशी 18 लोकांचा मृत्यू झाला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्याची माहिती आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला असेल तर यात काहीही गैर नाही. या मुद्द्याला विनाकारण वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांनी या प्रश्नातले गांभीर्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो मुद्दा काढला तो चांगला आहे. त्याबद्दल वाईट वाटण्यासारखं काही नाही, असं ते म्हणाले आहेत.

राज्यामधील जनतेने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही, असं वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य योग्य आहे. राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही झाला नाही. जेव्हा होण्याची वेळ आली. तेव्हा ते दुसऱ्या पक्षाला दिलं, शरद पवार यांची महाराष्ट्रात ताकत असली तरी सत्ता हाती आली नाही. हेही तितकंच सत्य आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली ऑफर दिली आहे. तुम्ही कशाला घाबरता तुम्ही इंडियामध्ये या तुम्हाला पंतप्रधान करू. हा शब्द तुम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा देतील, असं म्हणत विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. विनायक राऊत कसंही स्टेटमेंट करतात. आपली लायकी आणि पोच पहिली पाहिजे, माणसाने लायकी पाहून वक्तव्य करावं, असं संजय शिरसाट म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.