वाढदिवसाच्या दिवशी संभाजीराजे यांची मोठी घोषणा, आता पुढचा निर्णय…
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे. राजकीय प्रवास कसा असणार याबद्दल स्पष्टता केली नसली तरी 2024 मध्ये काय चित्र असणार हे सांगून टाकलं आहे.
नाशिक : संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा वाढदिवस ( Birthday ) यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये पार पडलाय. नाशिक शहरात ( Nashik News ) एकीकडे भाजपाने समर्पण दिनानिमित्ताने मेळाव्याचे आयोजन केलेले असतांनाच संभाजीराजे छत्रपती यांनी शक्तीप्रदर्शन करत राजकीय भूमिका जाहीर केली आहे. संभाजीराजे यांनी आता चळवळीत काम करून थकलो आहे. त्यामुळे आता बस्स झालं म्हणत स्वराज्य संघटना शंभर टक्के राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढणार असून सत्तेत सुद्धा असेल असंही जाहीर केलं आहे.
खरंतर काही महिन्यांपूर्वी संभाजीराजे यांनी राज्यसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शवत निवडुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मदत करण्याचे आवाहन केले होते.
मात्र, त्यावेळी सर्वपक्षीयांनी पाठिंबा न दर्शविल्याने संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेत नवी भूमिका राजकीय केली होती. स्वराज्य संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर करत सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिला होता.
त्यानंतर संपूर्ण राज्यभर दौरे करत संभाजीराजे छत्रपती यांनी गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य अशी संकल्पना राबवली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद बघता स्वराज्य संघटना राजकीय पक्षात यावी अशी मागणी केली जात होती.
त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्टच भूमिका घेत. आता बस झालं, मी थकलोय, चळवळीत खूप कामं केली पण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत यावंच लागेल असं म्हणत स्वराज्य संघटना 101 टक्के राजकारणात येणार असल्याचे म्हंटलं आहे.
याशिवाय, 2024 च्या निवडणुका स्वराज्य संघटना लढणार असून सत्तेत सुद्धा येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी कोणत्या पक्षात सोबत सत्तेत असणार याचा मात्र स्पष्ट उल्लेख न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे.
स्वराज्य संघटना आगामी काळात राजकीय पक्ष झाल्यावर कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करणार याची चर्चा आता होऊ लागली आहे. मात्र, याच कार्यक्रमाच्या दरम्यान संभाजीराजे यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणूनच्या घोषणा देखील दिल्या गेल्या आहे.
नाशिकच्या गंगापूर येथील गीता लॉन्स येथे संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संभाजीराजे संपूर्ण कुटुंबासहित उपस्थित होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळ संभाजीराजे यांची पेढे तुला आणि ग्रंथतुला करण्यात आली.
यावेळी स्वराज्य संघटना राजकारणात नसतांना स्वराज्य संघटनेच्या पाठिंब्याने मागील काही निवडणुकीतील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.