“राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर महाराष्ट्रात मारामाऱ्या होतील”

Amol Mitkari on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाष्य; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारणही सांगितलं...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर महाराष्ट्रात मारामाऱ्या होतील
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 1:18 PM

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, टीईटी घोटाळा अन् कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. आणि झाला तर राज्यात मारामाऱ्या होतील, असं अमोल मिटकरी म्हणालेत.

दिल्ली वारी नेहमी ठरलेली असते. पण मागच्या वेळी अमित शाहांनी शिंदे यांना तंबी दिली होती की जे वाचाळ मंत्री आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला पाहिजे. त्याबाबत चर्चा होणार असावी, असं मिटकरींनी म्हटलं आहे.

टीईटी घोटाळ्यापासून अब्दुल सत्तार यांचे प्रकरण बाहेर येत आहे. त्यामुळे भाजपची प्रतिमा मालिन होत आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिल्ली वारी करावी लागते आहे. अब्दुल सत्तार यांच्यामुळे शिंदेगट लोकांच्या नजरेतून उतरला आहे, असं म्हणत अमोल मिटकरी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी पत्र लिहिलं आहे. राज्यात महिलांवर अन्याय आणि सामाजिक सलोखा बिघडला आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. यावर गांभीर्याने लक्ष द्यावे अशी भूमिका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला निधी दिला जात नाही मला आतापर्यंत 5 कोटी पैकी फक्त 75 लाख रुपये देण्यात आले आहेत. डीपीडिसीतून आम्हाला 1 टक्का आणि सत्ताधारी आमदारांना 4 टक्के दिले जात आहे, सत्ताधारी आमदारांना 10 कोटी निधी दिला जात आहे, आमच्यावर आर्थिक अन्याय होत आहे. पण अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत, असंही ते म्हणालेत.

अकोल्यात कृषी पथकाच्या ताफ्यात प्रत्येक दुकानाला 5 लाख रुपये मागितले गेले. धाडी अवैध होत्या वसुलीचे रॅकेट होते. मंत्रालयातून पोलिसांना फोन आला आणि कारवाई झाली नाही त्यानंतरही वसुली करण्यात आली. रेड मारणाऱ्या 62 लोकांची यादी अब्दुल सत्तार यांनी जाहीर करावी रक्त कोण पित आहे, हे स्पष्ट होईल. जर चूक नसती तरी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना झापलं नसतं, मुख्यमंत्र्यांनी झापलं अब्दुल सत्तार यांना माफी सुद्धा मागावी लागली, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.