नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढा; मनसेचा नेता आक्रमक

| Updated on: Dec 11, 2023 | 1:30 PM

MNS Leader Prakash Mahajan on Nawab Malik : नवाब मलिक प्रकरणात मनसेने उडी घेतली आहे. नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढा, अशी मागणी मनसे नेत्याने केली आहे. गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरही या नेत्यांनं भाष्य केलं आहे. मनसेची भूमिका नेमकी काय? वाचा सविस्तर...

नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढा; मनसेचा नेता आक्रमक
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 11 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक अजित पवार गटाच्या बाजूला जाईन बसले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांनी महायुतीत येण्याला विरोध केला. त्यानंतर आता मनसेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढायला पाहिजे, असं महाजन म्हणाले.

मलिकांवर घणाघात

नवाब मलिक यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे जमीन मिळाला औषध उपचार करण्यासाठी मिळालेल्या जमीन सभागृहात येऊन कसा वापरू शकतात? देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं. पण शेजारी बसतात तर त्यांनी कानात विचारायला पाहिजे होतं की, तुमचा रेस्टींकीट झालेला विद्यार्थी सभागृहात कसा आला?, असं प्रकाश महाजन म्हणालेत.

ज्या व्यक्तीवर दाऊदसोबत आर्थिक व्यवहार असलेले संबंध आरोप झालेत. तो माणूस सभागृहात येणं ही बाब लांच्छनास्पद आहे. इतर पक्षाच्या आमदारांनी सुद्धा हे कसं सहन केलं, महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचा नवाब मलिक सभागृहात बसल्याचा काळाकुट्ट दिवस आहे, अशी टिपण्णी प्रकाश महाजन यांनी केली आहे.

अंबादास दानवेंवर निशाणा

सभागृहात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे शिलेदार हे सभागृहात दिसत नाहीत. का दिसत नाहीत याचं आश्चर्य वाटतं… अधिवेशनाचा कारभार दुबईवरून पाहत आहेत. नवाब मलिक यांच्यावर अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला नाही. कारण नवाब मलिक यांना अंबादास दानवे यांच्या वरिष्ठांनी मंत्रिपदावरून काढलं नव्हतं. उध्दव ठाकरे सभागृहात आले. ही चांगली बाब काही मुद्देसमोर बसून जास्त कळतात, असं प्रकाश महाजन म्हणाले.

450 रुपयांचं गॅस सिलेंडर हे राजस्थानसोबत महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे. याचा विचार भाजपने केला पाहिजे. अजित पवार रात्री झोपेतून दचकून उठत नाहीत. कारण त्यांना त्यांची उडी सध्या योग्य पडलीय असं वाटतं, असंही प्रकाश महाजनांनी म्हटलं आहे.