आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?

Ambadas Danve on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : आयजीच्या जीवावर बायजी उदार! असं राज्यातील शिंदे सरकार! संजय राऊत बोलले ते खरंच, सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; कुणी दिला दुजोरा?

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 11:49 AM

छत्रपती संभाजीनगर | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. ग्रामी भागा एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार!, या म्हणी प्रमाणे राज्यातील सध्याचं सरकार आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करेल की नाही ही शंका आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मोदी सरकारला INDIA आघाडी सध्या पर्याय देत आहे. यामुळे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. NDA पेक्षा इंडिया आघाडी मजबूत आहे. लोकांचा या आघाडीला पाठिंबा आहे, असं अंबादास दावने म्हणालेत.

राज्याची नमो योजना कुठं गेली? शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेलेली आहेत. पाऊस होत नाहीये. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अशात सरकाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार युती सरकारमध्ये आल्याने भाजप आणि शिंदेगटाच्या वाट्याची पदं अजित पवार यांच्याकडे गेली आहेत. यामुळे शिंदे गटातील नेते आणि भाजपचेही आमदार नाराज आहेत. भाजपची नाराजीच भाजपला भारी पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावेळी दंगली, हिंसाचार होईल, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलले ते खरंच होतं. दंगली घडल्या हा सरकारचा प्रताप होता. राज्यात सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती जणांवर कारवाई केली गेली, हे सरकारने सांगावं. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात, असं अंबादास दानवे म्हणालेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.