Nana Patole : पाच राज्यात निवडणुकांचं वारं; काँग्रेसची तयारी कितपत? नाना पटोलेंनी आराखडा मांडला

| Updated on: Oct 10, 2023 | 4:05 PM

Nana Patole on 5 State Vidhansabha Election 2023 : पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. यात काँग्रेसचा विजय होईल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी या निवडणुकांवर आणि सर्व्हेवर भाष्य केलंय. पाहा नाना पटोले काय म्हणाले....

Nana Patole : पाच राज्यात निवडणुकांचं वारं; काँग्रेसची तयारी कितपत? नाना पटोलेंनी आराखडा मांडला
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 10 ऑक्टोबर 2023 : पाच राज्यात सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. या निवडणुकांमध्ये काँग्रेस ताकदीने उतरली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढतो आहोत. जनता आमच्या सोबत आहे. सर्व्हेमध्येदेखील आमच्या जास्त जागा दाखवत आहेत. सगळी व्यवस्था दुरुस्त करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं नाना पटोले म्हणालेत.

छत्रपती संभाजीनगर पार पडलेल्या बैठकीवरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनिया गांधी यांच्या सूचनेचं पालन केलं की नाही हे पाहायला आलो. भाजपने मराठा समाज आणि इतर समाजाला आरक्षण मिळेल, असं 2014 च्या निवडणुकीत जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आरक्षण दिलं नाही. देऊ पण शकणार नाही. गरिबी जात आहे याचा अर्थ महागाई वाढवून जगणं मुश्किल केलं आहे. दुर्दैवी व्यवस्था निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे या सगळ्यातून देशाला बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोक आमच्यासोबत आहेत, असं नाना पटोले म्हणालेत.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्येला भाजप जबाबदार आहे. जायकवाडीच्या धरणात पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी आहे. दुष्काळ परिस्थिती असता दुष्काळ जाहीर करावा, ही मागणीही आम्ही करत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

मराठा विरुद्ध ओबीसी अस कुणी करू नये. मराठा विरुद्ध ओबीसी हा मानस यशस्वी होणार नाही. महिला आरक्षण भाजपसाठी जुमला आहे. 50 टक्केची मर्यादा उघडली तर सर्वांना आरक्षण मिळेल, असंही नान पटोले यांनी म्हटलं आहे.

मेडिकल कॉलेज संदर्भात केंद्र सरकारच्या निर्णयाचे पालन राज्य सरकारने केलं नाही. अमित देशमुख यांच्या काळात खाजगीकरणाला सुरूवात झाली असे काही नाही. अशोक चव्हाण हे आलेले आहेत. त्यांचं फक्त नांदेडवरच नाही तर संपूर्ण मराठवाड्यावर लक्ष आहे, असं म्हणत नांदेडमधील रुग्णमृत्यू प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.