“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र

| Updated on: Dec 04, 2022 | 2:48 PM

उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र लिहिलं आहे.

मुजरा महाराज... तुमच्याशी बोलावसं वाटतंय..., उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
Follow us on

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. या सगळ्या विधानांवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुकतंच रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेलं भावनिक पत्र या मेळाव्या दरम्यान वाचून दाखवलं. हे पत्र त्यांनी फेसबुकवरही शेअर केलं आहे.

उदयनराजे यांचं पत्र जशास तसं

मुजरा महाराज,

महाराज… आज खुप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश-वंश म्टशन नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतीय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला पावणे चारशे वर्षे झाली. एवढ्या वर्षांत आम्हाला कुणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाटी, कारण, आपण रयतेसाठी इतके मीठे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र आपला हिंदुस्थान, आपण घान दिलेल्या आदर्शांवर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. अलिकडच्या काळात बद झाली. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय अशी रास्त भीती निर्माण झाली अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येवून मन विषण्ण झाले म्हणूनच फक्त मनमोकळं करायला लिहितोय, मनोमन समक्ष उपस्थित राहून तिज साधण्याचा प्रयत्न करती सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठं? व्यथा मांडायची कुठं? सगळं दिशाहीन झालंय पकड़ी विश्वासाई ठिकाण राहीलं नाही म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज..

महाराज, आपण इथल्या किल्ल्यात, पर्वतात, नदीत जंगलात, डोंगररांगात मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणा-या प्रत्येक शब्दात आनंदी तेवढाच आदर “असतो. अभिमान असतो. डोक्यात मोठा आणि छोटा मेंद्र, जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर नितमस्तक आहे. पण छोटा आणि मोठा मेंदू सोहन, काही मुठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा असतो. दा भरताना, सटकून डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात वाईट वाटतं विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील हि विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची नांगी जिरवावीच लागेल. दा आपल्या सारख्या विश्वाचे दैवत असलेल्या छत्रपतीचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही. आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढाच ढक्क प्रत्येक मावळयाचा आहे. मायमाऊलीचा हक्क आहे. वडीलधा-यांचा आणि सर्वांचाच दक्क आहे म्हणून आपल्याबद्दल चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत दाखवणा-या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले आहे, पण आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील दी विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकटयाची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही. दी फक्त मराठी

माणसाची लढाई नाही तर देशाच्या अस्मितेचा लढा आहे म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतीय महाराज एक गीष्ट आज पुन्हा प्रकपनि जाणवली. तुमचे मावळे नावालाच एक आहेत. आमचे गट तट वाढलेत. प्रत्येकाला त्याचा गट, त्याची विचारधारा याचा फायदा बघायचा आहे. दरकत नाही. पण एकत्र यायला एक कारण किंवा एक विषय आजही आम्हाला पुरेसा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो. जो कोणी आपला मावळा आहे तो आपल्यासाठी एकत्र येणारच. आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला शिरसावंद्य असेल. पण इथुन पुढे आपल्या बद्दल एक वाक्य काय, एक शब्द जरी कोणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा देवणार नाही. आपले संस्कार आहेत आमच्यावर आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो, आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात, पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर राजकारणी मुग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसुठ आपली तुलना कोणाशीदी करणा-यांना इतिहासाचा घडा शिकवावाच लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला म्हणून विकृतींना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो, आपल्या पदस्पशनि पावन झालेल्या या पवित्र भुमीत कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्वधर्म समभावाची शिकवण दिलीय. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांच्या सोबत आहोत. आणि जे काही करायचं ते आम्ही एकत्र मिळुन करु

महाराज आपल्याकडून एक गोष्ट शिकलीय, एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता. एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचे दे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. परंतु इथं काही विकृत माथी आहेत. ती कायमची वटणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखवणा-यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे आपल्या माणसावर वार करायचा नसतो पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अश्यांना कठोर शासन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. आणि महाराज, आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही. महाराज आशिर्वाद

जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय

वंदिता शाहस (नो शिवस्यैषा मुद्रा मुद्राय राजत)