जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात

देशभरात वादंग माजलेल्या भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन  भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला.

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात
Follow us
| Updated on: Jan 14, 2020 | 1:25 PM

पुणे : देशभरात वादंग माजलेल्या  जय भगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन  भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. यावेळी उदयनराजेंनी जय भगवान गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.(Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book)

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही.  छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.  (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book)

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book)

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, अनेक जाती धर्मातील लोक माझे जीवलग मित्र, कुठल्याही देशात धार्मिक स्थळी योद्ध्यांचा फोटो नसतो, केवळ आपल्या शिवरायांचा फोटो असतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

लोकशाहीने चाललोय, राजेशाहीने चाललो तर गोयल फियल कोण नाही. पुस्तक लांब राहील गोयलला विड्रॉल करेल. कुठं प्रबोधकार ठाकरे? शिवाजी महाराजांचा विसर पडला असेल तर आजोबांचा विचार तरी आठवा, असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच हल्ला चढवला.

उदयनराजे भोसले काय म्हणाले?

सर्वात प्रथम माझ्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे, या युद्धात जे कामी आले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही पत्रकार परिषद घेण्यामागे कोणतेही राजकारण नाही, मी कधी राजकारण केलं नाही करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोण्याबरोबरही केली जाते याचं वाईट वाटतं. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही.

काल जे पुस्तक प्रकाशित झालं मी वाचलं नाही पण वाईट वाटतं. जो गोयल म्हणून लेखक आहे त्याने मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली. वास्तविक जगात कोण्याचीच तुलना शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. कोणालाही जाणता राजा म्हणता, त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज. त्यांनी जे कार्य केले ते जगाला दाखवून दिलं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले ज्यांची प्रतिमा आपण देवघरात ठेवतो. तुलना तर सोडून द्या पण महाराजांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखं वागायचं प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. काही गळ्यात बिनपट्टे असणारे लोक लुडबुड करतात त्यांचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. मी राजघराण्यात जन्माला आलो हे माझं सौभाग्य समजतो. आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केलं.  सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली. सोयीप्रमाणे लिखाण करायचं? त्याला बाळकडू दिल नव्हतं, मानधन दिले नव्हते, असा हल्लाबोल उदयनराजे भोसलेंनी केला.

मागच्या जन्मात मी काहीतरी पुण्य काम केलं असावं म्हणून या घरात मी जन्माला आलो.  पण मी कधी महाराजांचे वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही गेली लोकशाही आली मग आम्ही ती मान्य केली. महाराजांची ज्यावेळेस सांगितले होते सर्वधर्म समभाव ही संकल्पना कुठे गेली?

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं का?

शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिले तेव्हा तुम्ही वंशजाना विचारायला आला होता का, महाशिवआघाडी नाव ठेवले तेव्हा विचारले का? शिव का काढून टाकले? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी. शिव वडा, हे वडा अरे महाराजांना काय आदराचे स्थान ठेवा ना, वडा पवा हे काय? आमदार प्रकाश गजभिये यांच्यावर टीका करताना थर्डक्लास कोणतरी आहे, असं उदयनराजे म्हणाले.

शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली

शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही, कारण आम्ही जरी वंशज असलो तरी आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. तुम्ही सर्वजण महाराजांचे कुटुंब आहे, राजांनी कधी तू कोणत्या जातीचा, किंवा धर्माचा असे मतभेद केले नाही.

दादरला मोठं शिवसेना भवन आहे, तिथं महाराज कुठं आहेत बघा, खाली कोण आहे वरती कोण आहे. शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली, वरती फोटो कुणाचा पाहा, वंशज म्हणून तुम्ही आमच्यासारख्यांवर टीका करता, शिवाजी महाराजांनी दिलेली आम्ही शिकवण पाळतो, निवडून येऊनही मी राजीनामा दिला, जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही, असं दयनराजे म्हणाले.

सत्तेसाठी कुत्र्यासारखे मागे पळालो नाही

सत्तेसाठी लूथ भरलेल्या कुत्र्यासारखं कोणाच्या माग पळालो नाही. खासदार म्हणून निवडून आलो राजीनामा दिला. तुमच्या वेळ संपलाय, बांगड्या काय आम्ही भरलेल्या नाहीत, कोणीही बोलायचं अन उदयनराजेन गप्प बसायचं असं होणार नाही.

जाणते राजे कोण?

सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. आरक्षणाचा विषय का लांबवता. शिवसेनेने इतिहास संशोधक आहात असं म्हणत माफी मागितली. कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण त्यांचं नाव का घेता.  त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहितले राजे जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते.

शिवसेना नाव काढून टाका ठाकरे सेना करा

हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं. शिवसेना नाव काढून टाका ठाकरे सेना करा ना, काय प्रॉब्लेम आहे, सरकार तर तुमचं आहे.  मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्यासोबत राहतात. महाराजांचं नाव घ्यायचं अन जातीय दंगली घडवून आणायच्या. भिवंडी आठवा,  श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल काय म्हणतो. हे खोटं आहे का? तीन शिवजयंत्या? अजून किती मानहानी करायची महाराजांची?  महाराष्ट्रातील जनता हे जास्त दिवस बघणार नाही.  शिवस्मारकाचं काय झालं? असे प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केले.

राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता

स्वार्थाने जे लोक एकत्र येतात, ते फार काळ टिकत नाहीत. हे मला महाराष्ट्र्याच्या जनतेला सांगायचं आहे. जे विचाराने एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होतं. मी शिवाजी महाराज नाही, माझ्याकडून चुका होतात, तुम्ही मला मित्र या नात्याने माझ्या चुका सांगा.  स्वातंत्र मिळवून काय मिळवलं? ही असली लोकशाही?  राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता.  लोकशाहीतले राजे आहेत हे. हे एवढे गर्भश्रीमंत कसे? शिवाजी महाराजांनी कधी स्वतःच घर भरलं नाही, असं उदयनराजे म्हणाले.

भिवंडी दंगल कोणी केली?

कोणी उठसुठ काही बोलायचं आम्ही ऐकून घ्यायचं असं होणार नाही. प्रत्येकाने भान ठेवावं. नलक्षवादी का निर्माण होतात? ज्यांना तुम्ही निवडून देता, त्यांना कधी तरी जाब विचारणार आहात की नाही? याद राखा यापुढं महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशोबाने वागा. तुमच्या कपटीपणाचं, गैरव्यवहाराचं खापर आमच्यावर फोडलं तर परिणामाला सामोरं जावं लागले, परिणाम काय होतील ते आत्ता सांगणार नाही. फक्त मी नाही तुम्ही सगळे महाराजांचे विचारांचे वारस आहात. हा संवेदनशील विषय आहे. आजपर्यत महाराजांच्या नावाचं फक्त राजकारण केलं. पूर्वी चार जाती होत्या, आज चारच्या चार हजार झाल्या आहेत.  भिवंडीची दंगल कोणी केली बघा.  जाणते राजे म्हणवणाऱ्यांनी जरा बघावं. सत्तेसाठी कठपुतली बनलेत. तुमचा वापर होऊ देऊ नका, असं चालत राहीलं तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्ला उदयनराजेंनी दिला.

शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दिला. आज प्रत्येक पक्षाने जात वाटून घेतली. शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी का केली जात नाही, असं जगभरातले लोक विचारतात. जेम्स लेनच्या पुस्तकावर मौन बाळगता,तुम्ही तुमचं राजकारण करत बसा. उदयनराजे कसे घाणेरडे आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या जातील, मला फरक पडत नाही,  असं उदयनराजे म्हणाले.

ह्या सगळ्यांचा राजीनामा घ्या, महाराष्ट्र सुखी होईल

स्वतःला जाणता राजा म्हणून घेण्याचा दुसरा कोणाचा अधिकार नाही.  पुस्तकाचा निषेध करतोय, ते माग घेतलयं. माझ्या पोटात एक अन ओठात एक असं नसतं.  सावध राहावं, परत जर बोलला तर तांगडून लोक मारातील. तेव्हा माझ्याकडे येऊ नका. माझे विचार हे पक्के आहेत, लोकांचे हित लक्षात घेऊन वाटचाल करतो. ह्या सगळ्यांचा राजीनामा घ्या, महाराष्ट्र सुखी होईल, असं उदयनराजे म्हणाले.

लोकशाहीने चाललोय, राजेशाहीने चाललो तर गोयल फियल कोण नाही. पुस्तक लांब राहील गोयलला विड्रॉल करेल. कुठं प्रबोधकार ठाकरे? शिवाजी महाराजांचा विसर पडला असेल तर आजोबांचा विचार तरी आठवा, असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच हल्ला चढवला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.