“आमचे बंधूराज…” छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो, उदयनराजेंचं ट्विट पाहिलंत का?

ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला (Udayanraje Bhosle wishes ShivendraSinhraje Bhosle)

आमचे बंधूराज... छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो, उदयनराजेंचं ट्विट पाहिलंत का?
उदयनराजे भोसलेंनी बंधू शिवेंद्रराजेंसोबतचा फोटो शेअर केला
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:50 AM

सातारा : सातारा-जावळीचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने भाजपचे राज्यसभा खासदार आणि बंधू छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Chhatrapati Udayanraje Bhosle wishes brother Chhatrapati ShivendraSinhraje Bhosle on birthday)

“आमचे बंधुराज सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.” असं लिहित उदयनराजेंनी दोघांचा फोटोही शेअर केला आहे.

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले कोण आहेत ?

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. (Chhatrapati Udayanraje Bhosle wishes brother Chhatrapati ShivendraSinhraje Bhosle on birthday)

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीत घरवापीची ऑफर

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफरही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.

उदयनराजेंचीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं.

संबंधित बातम्या :

आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी

शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?

(Chhatrapati Udayanraje Bhosle wishes brother Chhatrapati ShivendraSinhraje Bhosle on birthday)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.