दमयंतीराजेंचा वाढदिवस, उदयनराजेंची खास पोस्ट!

उदयनराजेंनी खास पोस्ट लिहून राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दमयंतीराजेंचा वाढदिवस, उदयनराजेंची खास पोस्ट!
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 9:00 PM

साताराखासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी खसखस पिकवणारी वक्तव्ये, कधी राजकीय टोलेबाजी, कधी कोपरखळ्या तर कधी मध्येच चुटकी मारुन कॉलर उडवणं… मात्र हे सगळं जरी असलं तरी उदयनराजे फार कुटुंबवत्सल आहेत. त्यांचं त्यांच्या कुटुंबावर जीवापाड आहे. आज उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराणी यांचं वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसादिनी उदयनराजेंनी खास पोस्ट लिहून राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Chhatrapati UdyanRaje Bhosale Facebook Post over Damyantirani BirthDay)

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच माझ्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या माझ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी खूप खूप शुभेच्छा….आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा, अशा खास शब्दात पोस्ट लिहून त्यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उदयनराजेंनी दमयंतीराणींना शुभेच्छा देण्यासाठी केले्ल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी तुफान लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. उदयनराजेंच्या चाहत्यांनी आणि त्यांना मानणाऱ्या व्यक्तींनी राणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उदयनराजेंनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीचं कौतूक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

दमयंतीराजे भोसले असं उदयनराजेंच्या पत्नीचं नाव आहे. उदयनराजे आणि दमयंतीराणी यांचा विवाह 20 नोव्हें. 2003 रोजी झाला. उदयनराजे-दमयंतीराणींना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

खरंतर, उदयनराजे हे त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. इतकंच नाही तर उदयनराजे भोसले अनेकदा सुसाट बाईकही चालवताना दिसतात. एकदा तर निवडणुकीत उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी उदयराजेंनी बाईकवर स्वारी केली होती. त्यांची हिच हटके स्टाईल आज पुन्हा एकदा दिसली आहे.

हे ही वाचा

‘राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली’; उदयनराजेंकडून पत्नीला खास शैलीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Udayanraje Bhosale | MPSC परीक्षेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची पोस्ट

देवेंद्र माझा खास मित्र, त्याचं काय चुकलं? : उदयनराजे भोसले

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.