छत्तीसगडमध्ये रमण सिंहांचं चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार?
मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठीधोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे. त्यापूर्वी टीव्ही 9मराठी एक्झिट पोलच्या माध्यमातून सत्तेची चावी कुणाकडे […]
मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठीधोक्याची घंटी मानली जाते. त्यामुळे तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)आणि राजस्थानमधील सत्ताधारी भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे. त्यापूर्वी टीव्ही 9मराठी एक्झिट पोलच्या माध्यमातून सत्तेची चावी कुणाकडे याचं सखोल विश्लेषण करणारआहे.
छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत?
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप बहुमतासह सत्तेत येताना दिसत आहे. तर काँग्रेसला 35 जागा मिळत आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत, मात्र सत्ता राखण्यात यश येताना दिसतंय. भाजपला यावेळी 46 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं या पोलमध्ये म्हटलंय.
छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत आणि बहुमतासाठी 46 जागांची गरज आहे. भाजपला बरोबर बहुमताएवढ्याच जागा मिळताना दिसत आहेत. बहुजन समाज पार्टी आणि जनता काँग्रेस यांच्या आघाडीला सात जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
रमण सिंग हे गेल्या पंधरा वर्षांपासून छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. यावर्षीही पक्षाने त्यांच्यावरच विश्वास दाखवला आणि रमण सिंहांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढली. ते सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होत असल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यांमधून दिसत आहे.
आजतकचा एक्झिट पोल
आजतकच्या सर्व्हेनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता जाताना दिसत आहे. काँग्रेस 90 पैकी 55-65 जागांसह पूर्ण बहुमताने सत्तेवर येताना एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय.
न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 38 ते 42 जागा मिळत आहेत. हा आकडा बहुमतापासून दूर आहे. तर काँग्रेसला 42-44 जागा दाखवण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडमधील 2013 सालची परिस्थिती
मध्य प्रदेशमधून वेगळं झालेलं छत्तीसगड हे राज्य गेल्या 15 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 90 विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या निवडणुकीत 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य टक्कर आहे.