Explainer : Chhattisgarh Assembly Elections 2023 | बघेल की चंदेल? छत्तीसगडचा गड कोण राखणार? तिरंगी लढतीत मतदारांचा कौल कुणाला?

उद्या गुरुवारी एक्झिट पोलचे निकाल बाहेर येतील. त्याचवेळी मतदारांनी छत्तीसगडचा गड कुणाच्या ताब्यात सोपवला आहे याचा अंदाज येणार आहे. पण, खरी सत्ता कुणाची याचा फैसला मात्र 3 डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे त्या खऱ्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Explainer : Chhattisgarh Assembly Elections 2023 | बघेल की चंदेल? छत्तीसगडचा गड कोण राखणार? तिरंगी लढतीत मतदारांचा कौल कुणाला?
Chhattisgarh Assembly Elections 2023
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 11:18 PM

Chhattisgarh Assembly Elections 2023 | 29 नोव्हेंबर 2023 : छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. 3 डिसेंबरला मतदान मोजणी आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 20 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर उर्वरित 70 जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर 78 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर 75.88 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावल आहे. दोन्ही टप्प्यात 90 जागांवर एकूण 76.31 टक्के मतदान झाले. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर, माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांनी जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) या पक्षाचे ८० उमेदवार उभे करून कॉंग्रेस आणि भाजपला आव्हान दिलंय.

छत्तीसगडचे तिसरे आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस विधानसभेच्या 90 जागा लढवीत आहे. डॉ. भूपेश बघेल यांनी ८० च्या दशकात युवक काँग्रेसमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्षही होते. पाटण हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ. येथून बघेल पाच वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये ते अविभाजित मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री होते.

नोव्हेंबर 2000 मध्ये छत्तीसगड राज्याच्या निर्मिती झाली. त्यानंतर त्यांनी पतन येथून निवडणूक लढविली आणि ते जिंकलेही. छत्तीसगड विधानसभेत 15 वर्षे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केले. 2018 मध्ये त्यांनी पाटण मतदारसंघातून भाजपच्या रमण सिंह यांचा पराभव केला. राज्यातील एक सक्षम नेतृत्व म्हणून कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले. 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हे सुद्धा वाचा

बघेल यांना चंदेल यांचे आव्हान

छत्तीसगडमधील भाजपचे नारायण चंदेल यांचे मुख्य आव्हान मुख्यमंत्री बागेल यांच्यासमोर असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले नारायण चंदेल हे भाजपचे सक्रिय सदस्य आणि प्रभावी वक्ते आहेत. सध्या ते छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. जांजगीर चंपा या विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.

1998 मध्ये ते पहिल्यांदा मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले. छत्तीसगड राज्य निर्मितीनंतर याच मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण, कॉंग्रेसच्या मोतीलाल दिवांगन यांनी त्यांचा अवघ्या थोड्या मताने पराभव केला. पण, 2008 साली निवडणूक जिंकून ते विधानसभेचे उपसभापती झाले. 2018 मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र, सत्ता कॉंग्रेसच्या हाती गेल्याने त्यांना विरीधी पक्षनेते करण्यात आले. या निवडणुकीत चंदेल यांच्या नेतृत्वाखाली भाजप छत्तीसगडच्या सर्व म्हणजेच 90 जागांवर निवडणूक लढवीत आहे.

छत्तीसगड निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना रिपब्लिक पार्टी यांनी युती केली आहे. तुलेश्वर सिंग मरकम यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना रिपब्लिक पार्टी विधानसभेच्या १९ जागा लढवीत आहे. तर, बसपाने 9 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) पक्षाची स्थापन केली. माजी आमदार अमित जोगी यांचा जनता काँग्रेस छत्तीसगड हा पक्ष ८० जागा लढवीत आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रससमोर अमित जोगी यांच्या रूपाने एक कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

आम आदमी पार्टीची स्पर्धा कुणाशी?

दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या आपनेही छत्तीसगडच्या रणांगणात उडी घेतली आहे. आप छत्तीसगडमध्ये 90 पैकी 57 जागा लढवीत आहे. AAP चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेत राज्यात आपचे सरकार आल्यास पेसा कायदा एका महिन्याच्या आत लागू केला जाईल अशी घोषणा केलीय. तसेच, जल, जंगल आणि जमिनीचे संपूर्ण अधिकार ग्रामसभेला दिले जातील अशे जाहीर केलेय.

छत्तीसगड विधानसभेची मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने आहे याचा निकाल सध्या तरी मतपेटीत बंद आहे. त्याचवेळी उद्या गुरुवारी एक्झिट पोलचे निकाल बाहेर येतील. त्याचवेळी मतदारांनी छत्तीसगडचा गड कुणाच्या ताब्यात सोपवला आहे याचा अंदाज येणार आहे. पण, खरी सत्ता कुणाची याचा फैसला मात्र 3 डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे त्या खऱ्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.