भाजपचे संकटमोचक संकटात, नाशिकमधून राष्ट्रवादीच्या नव्या संकटमोचकांचा उदय?

भाजप सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांना विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला आहे. नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातल्या 47 जागांपैकी 42-45 जागा खिशात घालू म्हणणाऱ्या महाजन यांना वल्गना केल्यापैकी निम्म्या जागाही जिंकून आणता आलेल्या नाहीत. हे चित्र बघितल्यानंतर भाजपची झालेली दमछाक आणि राष्ट्रवादीचा झालेला कमबॅक स्पष्टपणे जाणवतो.

भाजपचे संकटमोचक संकटात, नाशिकमधून राष्ट्रवादीच्या नव्या संकटमोचकांचा उदय?
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 5:38 PM

नाशिक : संपूर्ण राज्यात भाजप सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सध्या त्यांच्याच बालेकिल्यात संकटात सापडल्याचं चित्र आहे (Girish Mahajan vs Chhagan Bhujbal). उत्तर महाराष्ट्रातल्या 47 पैकी 42 ते 45 जागा जिंकू असा दावा करणाऱ्या गिरीश महाजनांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागाही जिंकता आल्या नाहीत. तर दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दमदार कमबॅक केलं (Girish Mahajan vs Chhagan Bhujbal). त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नवे संकटमोचक म्हणून समोर आले.

गेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी हुरळून गेलेल्या भाजपने यावेळी मतदारांना गृहीत धरण्याची चूक केली आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसला. युतीची सत्ता स्थापन होणार असली, तरी या निकालांमुळे मतदारांचा सत्ताधाऱ्यांबद्दलचा रोष मात्र समोर आला आहे. भाजप सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही मोठा फटका बसला आहे. नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातल्या 47 जागांपैकी 42-45 जागा खिशात घालू म्हणणाऱ्या महाजन यांना वल्गना केल्यापैकी निम्म्या जागाही जिंकून आणता आलेल्या नाहीत. भाजप उत्तर महाराष्ट्रात केवळ 16 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. हे चित्र बघितल्यानंतर भाजपची झालेली दमछाक आणि राष्ट्रवादीचा झालेला कमबॅक स्पष्टपणे जाणवतो.

भाजपच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव

भाजपने मतदारांना गृहीत धरुन केलेली आकडेमोड तर यशस्वी ठरली नाहीच, पण त्याचा मोठा फटका स्वत: भाजपला बसला. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. रोहिणी खडसे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे यांचा पराभव भाजपला निश्चितपणे आत्मचिंतन करायला लावणारा आहे. तर दुसरीकडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, सरोज आहिरे यांचा विजय राष्ट्रवादीचा हुरुप वाढवणारा आहे.

निवडणुकांमध्ये झालेल्या चुकांमधून बोध घेत पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेऊ, असं सांगणारे छगन भुजबळ यांनी भविष्यात भाजपाची दमछाक होणार याचं सुतोवाच केलं. भुईसपाट झालेल्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात नंबर वन बनवणारे भुजबळ यांचं या निमित्तानं राजकारणात जोरदार कमबॅक झालं आहे.

उत्तर महाराष्ट्रात विभागवार विचार करायचा झाला, तर जळगावमधे नाथाभाऊंचं तिकीट कापून रोहिणी खडसेंना देणं, हे खडसेंना संपवण्याचं कारस्थान असल्याचं सुरुवातीलाच लक्षात आलं. याशिवाय, शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांना देखील भाजपनेच रसद पुरवल्याचीही चर्चा आहे.

शिर्डीसह नगरमध्ये युती फक्त तीन जागांवर विजयी

लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याचं वातावरण ढवळून निघालं होतं. विखे कुटुंबियांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंनंतर आता विधानसभेत देखील विखेंचाच शिक्का चालेल, असं चित्र निर्माण केलं गेल. मात्र, तसं काही झालं नाही. कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना धूळ चारली, तर बाळासाहेब थोरातांनी संगमनेरचा आपला गड राखला. शिर्डीसह नगरमध्ये फक्त तीन जागांवर युतीला समाधान मानावं लागलं.

धुळे आणि नंदुरबारमधलं वातावरण आयाराम गयारामांमुळे ढवळून निघालं. अनिल गोटेंच्या बंडखोरीमुळे आरोप प्रत्यारोपांच्या यथेच्छ फैरी झडल्या. या दोन्ही जिल्ह्यात काँग्रेस नावालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा घेतलेल्या गिरीश महाजन यांची ही प्रतिज्ञा धुळीस मिळाली. नावापूरमधून काँग्रेसचे स्वरुपसिंह नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक, तर अक्कलकुव्यातून के. सी. पाडवी हे विजयी झाले. धुळे जिल्ह्यातही फारुख शाह यांच्या माध्यमातून एमआयएमने खातं उघडलं.

गिरीश महाजन यांचं काय चुकलं?

विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरल्याने गिरीश महाजन यांना होम पिचवरच बॅक फुटवर जावं लागलं आहे. गिरीश महाजनांनी विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर पक्षाचे निर्णय लादले. शिवसेनेशी युती असतानाही अनेक ठिकाणी गिरीश महाजनांनी बंडखोरांना पाठिंबा दिला. त्याचा फटका भाजपला बसला. तसेच, मतदारांना गृहीत धरुन दुसऱ्या पक्षातून आलेल्या आयारामांना तिकीट देणं भाजपला भोवलं. शिवाय, राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करताना होम पिचवर गिरीश महाजनांची पकड ढिली झाली, हे या निवडणुकीवरुन दिसून आलं.

उत्तर महाराष्ट्रात संपूर्णपणे युतीचा कब्जा असेल, असा दावा करणाऱ्या भाजपला मतदारांनीच त्यांची जागा दाखवली, अशी चर्चा सध्या राजकिय वर्तुळात रंगली आहे. आम्ही सांगू ती पूर्व दिशा, आम्ही ठरवू तो उमेदवार, आमच्याशिवाय पर्यायच नाही, असे हवेतले विधान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी चांगलंच जमिनीवर आणलं आहे, असंही बोललं जात आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.