सुजय विखे पाटील यांचं बंड वाया जाणार नाही: मुख्यमंत्री
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. […]
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे पाटील यांचं स्वागत केलं. “सुजय विखे पाटील यांच्या रुपाने भाजपमध्ये तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराची भर पडली. सुजय विखेंना घरातच बंड करावा लागला, मात्र काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल”, असं मुख्यमंत्रीणाले.
रेकॉर्ड मतांनी निवडून येतील
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्री म्हणाले, “सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातली नाही. मात्र त्यांच्यासारखा सुशिक्षित तरुण आल्याने महाराष्ट्रात नवं नेतृत्त्व तयार होईल. नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांचं नाव भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार. आम्ही नाव पाठवल्यामुळे तिकडून होकार येईलच. नगरमध्ये सुजय विखे पाटील रेकॉर्ड मतांनी निवडून येतील”
केंद्रात 2014 पेक्षा जास्त जागा येतील, महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा येतील, सेना-भाजप आणि मित्रपक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
डॉ. सुजय विखेंच्या रुपाने तरुण आणि सुशिक्षित नेतृत्त्वाची भाजपमध्ये भर पडली, मी सुजय विखेंचं स्वागत करतो. डॉ सुजय विखेंनी कोणतीही अट घातली नाही. सुजय यांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगलं नेतृत्त्व मिळू शकतं. भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन सुजय विखेंना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.
सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया
“मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील” असे यावेळी सुजय विखे म्हणाले.
VIDEO: