Eknath Shinde : एकीकडे देशाचे नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक, मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण?

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहातील पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या निशान्यावर देशाचे नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे असल्याचे पाहवयास मिळाले. इतर वेळी त्यांच्या भूमिकेमुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पण यावेळी मात्र, आमदारांचा विश्वास असल्याने ते देखील बाळासाहेबांच्या सैनिकापुढे काही करु शकले नाहीत.

Eknath Shinde : एकीकडे देशाचे नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक, मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 12:52 PM

मुंबई : गेल्या 10 ते 12 दिवसांतील राजकीय नाट्यानंतर आता चित्र स्पष्ट होत आहे. (CM Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, या निवडीनंतर राजकीय क्षेत्रात ओढावलेली परस्थिती आणि शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेचा उहापोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. शिवाय नाराज आमदारांची भूमिका ही स्पष्ट होती. त्यामुळेच सत्तेत असतानाही त्यांनी माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शिवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात घडेलेल्या (Politics) राजकीय घडामोडी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. कारण एकीकडे देशाचे नेते होते तर दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक असे म्हणत आपल्या पहिल्याच मनोगतामध्ये त्यांनी अप्रत्यक्ष खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोगत व्यक्त करताना अनेक मुद्द्यांना हात घातला.

50 आमदारांमुळेच सर्वकाही शक्य

सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वकाही केले जाते. पण 50 आमदारांनी सत्तेच्या मागे न जाता भविष्याचा आणि जनतेच्या विकासाचा ध्यास घेत मला साथ दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 50 आमदार ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच हे शक्य झाला आहे. इतरवेळी सत्तेत स्थान मिळावे म्हणून पक्षांतर होत असेल पण यावेळी सत्तेतून बाहेर पडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास टाकला म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या आमदारांचे कौतुक केले. राज्यातील राजकारण हे सर्वांना ज्ञात असताना त्यांनी हे पाऊल उचलल्यानेच आजचे परिवर्तन झाल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

प्रमुख नेत्यांवरच बोचरी टिका

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहातील पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या निशान्यावर देशाचे नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे असल्याचे पाहवयास मिळाले. इतर वेळी त्यांच्या भूमिकेमुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पण यावेळी मात्र, आमदारांचा विश्वास असल्याने ते देखील बाळासाहेबांच्या सैनिकापुढे काही करु शकले नाहीत. तर दुसरी संजय राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला. दिसतं तेवढे हे सोपे नव्हते तर आमच्यां संपर्कात आमदार आहेत अशा वावड्या देखील उठविल्या जात असल्याचे शिंदे म्हणाले. त्यांच्या निशान्यावर राऊतच होते.

हे सुद्धा वाचा

तर देशाने दखल घेतली

सत्तेतून पायउतार होऊन देखील देशाने दखल घेतली असे हे पहिलेच उदाहरण आहे. मात्र, यामागचा हेतू आणि जनेतेची कामे या दोन गोष्टीच महत्वाच्या होत्या. सत्तेसाठी कायपण करणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काही नसताना 50 आमदारांनी टाकेलेला विश्वास हीच खरी जमेची बाजू राहिली आहे. आता भविष्यात जनतेची विकासकामे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हाच हेतू राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.