सरकारची कामं हजम होत नाहीत म्हणून… मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका
आपण चहापान ठेवतो. पण, ती बहिष्कार घालण्याची प्रथा त्यांनी कायम ठेवली. त्यांना चहापानपेक्षा राजकारणात जास्त इंटरेस्ट आहे. उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय. विरोधी पक्षाने मुद्दे मांडले. पहिल्यांदाच 2 विरोधी पक्षनेत्यांच्या लेटर हेड दिलंय. सगळंच चलबिचल आहे. अस्थिरता आहे.
मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : राज्य विधीमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. याचे कारण देताना विरोधकांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू असल्याची टीका केली. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे असे अनेक गंभीर आरोप करत अधिवेशन गाजविण्याचे संकेत दिले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. तसेच. त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय. विरोधी पक्षाने मुद्दे मांडले. पहिल्यांदाच 2 विरोधी पक्षनेत्यांच्या लेटर हेड दिलंय. सगळंच चलबिचल आहे. अस्थिरता आहे असा टोला त्यांनी लगावला.
आपण चहापान ठेवतो. पण, ती बहिष्कार घालण्याची प्रथा त्यांनी कायम ठेवली. त्यांना चहापानपेक्षा राजकारणात जास्त इंटरेस्ट आहे. सरकारने अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. 45 हजार कोटी रुपयांची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना केली आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
1 रुपयात पीक विमा योजना दिली यावरून त्यांनी टीका केली. शेतकरी, महिला भगिनी, लेक लाडकी, एस टी मध्ये सवलत, महिला बचत गट…. infrastructure ची कामे असे निर्णय घेतले. अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे अनेक प्रकल्प केले. अटल सेतू गेम चेंजर आहे. दावोसमध्ये 3 लाख 83 हजार कोटींचे MOU केले. ग्रीन हायड्रोजन promote करणारं आपलं पहिलं राज्य आहे. खूप प्रकल्प सुरू आहेत. जलयुक्त शिवर, शेत तळ अनेक योजना आहेत. शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख प्रकल्प आहे. काही घरात बसले होते. पण, आम्ही जनतेच्या दारी जातोय असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील अनेक प्रकल्पाचं आज लोकार्पण, भूमिपूजन झालं. ही सगळी पोट दुःखी त्यांच्या पत्रातून दिसून येतेय. राज्यात सर्वागीण विकासाची कामे सुरू आहेत. एफडीआयमध्ये आपण पहिल्या नंबरवर आहे. जीडीपी मध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. आमची कामं हजम होत नाहीत म्हणून हे पत्र दिलेलं दिसत आहे, असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.