मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे काम पाहून नायक चित्रपटातील मुख्यमंत्री आठवला; एका दिवसात ST कर्मचाऱ्यांची…
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे.
मुंबई : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे. यामुळे एकनाथ शिंदेचे काम पाहून नायक चित्रपटातील मुख्यमंत्री आठवला आहे. एसटीचे चालक तथा वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेद्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळामध्ये 2019 मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. 1431 पात्र उमेदवारांची यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. मात्र, अनेकजण अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.
कोरोना महामारीमुळे दोन वर्ष ही भरती प्रक्रिया रखडली होती. मुख्यमंत्र्यांनी पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या भरती प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी 27 पुरूष आणि 22 महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले आहे.
एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार चालक भरती प्रक्रियेत तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागवण्यात आले होते. 203 महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
142 महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी 22 महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे स्टेअरिंग हातात घेणार आहेत.