Eknath Shinde: भेट मार्गदर्शनासाठी की पाठिंबा मिळवण्यासाठी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या 3 दिग्गज नेत्यांची भेट
सर्व प्रथम खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Senior Leaders Leeladhar Dake), यांची भेट घेतली. यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत मोठा राजकीय भूकंप केला. त्यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले. राज्यात शिंदे-फडणवीस असं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करत आहेत. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे.
गजानन किर्तीकर, लीलाधर डाके आणि मनोहर जोशी
सर्व प्रथम खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Senior Leaders Leeladhar Dake), यांची भेट घेतली. यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी सध्या भेटीगाठीचा सपाटा लावला आहे. अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी शिंदे घेत आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. तर बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत. तर मनोहर जोशी हे दखील शिवसेनेतील एक मोठ नाव आहे.
भेटी-गाठीचे अनेक अर्थ
जिथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार, खासदार यांना भेटत नव्हते असा आरोप केला जात आहे तिथे एकनाथ शिंदे यांनी भेटी-गाठीचा धडाका सुरु केला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते अॅक्शनमोडमध्ये असून मुख्यमंत्री पदाचा कारभार संभाळत असताना संघनात्मक वाढीवरही त्यांनी भर दिला आहे. शिवाय दुसरीकडे कुणावरही टिका न करता जनतेची कामे हेच आपले ध्येय असल्याचेही ते सांगत आहे. मुख्यमंत्री पादाची शपथ घेण्यापूर्वी केवळ आमदरांचा समावेश त्यांच्या गटामध्ये झाला होता. आता खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर पदाधिकारी देखील त्यांच्याकडे जात आहेत. यातच त्यांनी आता ज्येष्ठांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केल्याने वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.