CM Eknath Shinde: 12 खासदारांवर दबाव होता का? एकनाथ शिंदेंनी प्रश्न शेवाळेंकडे टोलवला

एवढ्या मोठ्या मतदारांचं नेतृत्व करतात अशा खासदारांनीही बाळासाहेबांच्या विचाराचं स्वागत केलं. लोकसभा अध्यक्षांना तसं पत्रं दिलं आहे. राज्यात जेवढं चांगलं काम करता येईल ते आम्ही करू, असे शिंदे पुढे म्हणाले.

CM Eknath Shinde: 12 खासदारांवर दबाव होता का? एकनाथ शिंदेंनी प्रश्न शेवाळेंकडे टोलवला
नवी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलताना एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 7:13 PM

नवी दिल्ली : शिवसेनेच्या 12 खासदारां (MP)नी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला राज्यानंतर आता केंद्रातही मोठा धक्का बसला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत खासदारांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. सर्व 12 खासदारांचं स्वागत करायचं होतं म्हणून दिल्लीत आलो. राहुल शेवाळे (Rahul Shewale) आमचे लोकसभेतील गट नेते आणि भावना गवळी या आमच्या मुख्य प्रतोद आहेत, अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. यावेळी दबावापोटी खासदार आले का? असा प्रश्न पत्रकारांकडून शिंदेंना विचारण्यात आला. मात्र शिंदे यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ करत गटनेते यावर बोलतील असे सांगत राहुल शेवाळेंकडे प्रश्न टोलवला.

काय म्हणाले शिंदे ?

असं कोण म्हणतंय. त्याबाबत आमचे गटनेते बोलतील, दबाव आहे की नाही. आणखी कोणी बोलले असते तर दखल घेतली असती. पण जे सकाळी रोज बोलतात. त्यांचा मॅटिनी शो बंद झाला आहे. ते रोज बोलतात. त्याची दखल घेण्याची गरज नाही. त्यांचं मॅटर कोर्टात होतं. कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांना कोणतीही क्लिन चीट दिली नाही. तुमची माहिती सुधारून घ्या, असे शिंदे म्हणाले.

आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्य प्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे. सर्व बारा खासदार आहेत. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्रं दिलं आहे. जे जे खासदार 22 लाख मतदारांतून निवडून येतात. एवढ्या मोठ्या मतदारांचं नेतृत्व करतात अशा खासदारांनीही बाळासाहेबांच्या विचाराचं स्वागत केलं. लोकसभा अध्यक्षांना तसं पत्रं दिलं आहे. राज्यात जेवढं चांगलं काम करता येईल ते आम्ही करू, असे शिंदे पुढे म्हणाले. (Chief Minister Eknath Shinde refused to talk about the entry of 12 MPs)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.