Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, शिवसेनेने तीच पकडली.. काय घडलं?

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुढाकार घेतलेल्या गोपीचंद पाडळकरांवरही सामनाने टीका केली आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी भाजपचे 'गोपीचंद जासूस' कोणत्या बिळात बसून आहेत, असा सवाल सामनातून करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, शिवसेनेने तीच पकडली.. काय घडलं?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:51 AM

मुंबई : महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती 2023 पासून ऐवजी 2025 लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेऊ शकले नाहीत आणि आजही ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आणि हे प्रश्न निवडणूक आयोगाकडेच पाठवायला हवेत, असे बोलण्यापर्यंत त्यांना बुद्धिचे अजीर्ण झाले आहेत, असा प्रहार शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावरून त्यांना कोंडीत पकडलंय. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MPSC आयोगाऐवजी चुकून निवडणूक आयोग असा शब्द वापरला. हेच वक्तव्य शिवसेनेनं उचलून धरंलय. मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली. ते आणि त्यांचे चाळीस लोक धुंदीत आहेत. पण बुद्धीचे गोपीचंद छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय, की सब घोडे बारा टके या न्यायाने सगळे चालले आहे, असे ताशेरे सामनातून मारण्यात आलेत.

‘पोरांनी धुंदी उतरवली’

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आलेल्या यशाचं खरं श्रेय विद्यार्थ्यांचं आहे. हजारो विद्यार्थी चार दिवस पुण्यातील रस्त्यांवर होते. अखेर मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागला. हा विद्यार्थी चळवळीचा विजय आहे. मुळात हा विषय खोक्यांशी संबंधित नसल्याने त्यांना आंदोलनाची धग समजली नाही. याचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्री शिंदे यांनीच दाखवून दिल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. चिंता करू नका एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फाइल मी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे, त्यांचा प्रश्न सुटेल… लोकसेवा आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाकडे फाइल पाठवणारे विद्वान मुख्यमंत्री आपल्याला लाभले, अशी शेलक्या शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.

आयोगाच्या निकालाची भांग…

मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे. पण निवडणूक आयोगाच्या निकालाची भांग पिऊन ते गपगार बसले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न सोडवून निकाल लावण्याचं काम निवडणूक आयोगच करणार व तसा पक्का सौदा ठरल्याचं मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसते, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

गोपीचंद जासूस कोणत्या बिळात?

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुढाकार घेतलेल्या गोपीचंद पाडळकरांवरही सामनाने टीका केली आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी भाजपचे गोपीचंद जासूस कोणत्या बिळात बसून आहेत, असा सवाल सामनातून करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलाची चिंता आहे, हे चांगले. पण महाराष्ट्रातील विद्यार्थीही कुणाची तरी मुले, भाऊ आहेत. त्यांचे भविष्य अधांतरी लटकून पडले आहे, याकडे कोण पाहणार, असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय.

बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत.