Eknath Shinde | औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या घोषणा आज केल्या आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहेत. यामुळे आता मराठवाड्याच्या खेळाडूंना मोठी संधी भेटणार हे नक्कीच. सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने रौप्यपदक मिळाले.
औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आज औरंगाबाद दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये प्रमुख म्हणजे औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला (Aurangabad) साकार होणारयं. इतकेच नाही तर मराठवाड्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आत्महत्या होऊ नये म्हणून प्रिव्हेंटीव्ह अॅक्शन घेतली पाहिजे. विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकारी यांना प्लान तयार करायला सांगितलं आहे. बँकांनाही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत केली मोठी घोषणा
एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या घोषणा आज केल्या आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहेत. यामुळे आता मराठवाड्याच्या खेळाडूंना मोठी संधी भेटणार हे नक्कीच. सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने रौप्यपदक मिळाले. त्याला 30 लाख आणि त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख रूपये देण्याची मोठी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलीयं. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा प्रश्न अडकून बसलायं. निवडणूकीमध्ये दरवेळी गोपिनाथ मुंडेंच्या स्मारकाचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार
औरंगाबाद दाैऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ मुंडे स्मारकातील अडचणी दूर असेही आश्वासन दिले आहे. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास देखील आता केला जाणार आहे. पीपीपी मॉडेल यशस्वी होत नाही. त्यामुळे सरकारच काम करणार ठाकरे स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्काळ करण्यासारखे प्रस्ताव, मीड टर्म आणि लाँग टर्मचे प्रस्ताव पाठवून ते मार्गी लावू असेही यावेळी सांगण्यात आले. वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी आली होती. नांदेड शहराच्या रस्त्याचे प्रस्ताव आला. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. नांदेड-जालना एक समृद्धी हायवे करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.