CM Eknath Shinde । मोकळ्या वातावरणात महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला गणेशोत्सव, काय म्हणाले पहा….

सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करावी,असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्त आणि गणेशमंडळांना केलंय.

CM Eknath Shinde । मोकळ्या वातावरणात महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला गणेशोत्सव, काय म्हणाले पहा....
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 11:28 AM

मुंबईः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच गणेशोत्सव (Ganesh Festival) आहे. या प्रमाणेच कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षे राज्यातील नागरिकांनाही घरात गणेशोत्सव साजरा करावा लागला. मात्र दोन वर्षानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून यावर्षीचे सगळेच सण उत्साहात मोकळेपणाने साजरे करण्याचं आवाहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. राज्यातील सत्ता संकटानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) यांनी यापूर्वीचा दहीहंडीचा उत्सवही जल्लोषात साजरा केला. आज गणेशोत्सवाच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आजपासून महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा करुयात, असं आवाहन जनतेला केलं.

Eknath Shinde warsha

वर्षा बंगल्यावर बाप्पाची स्थापना

मुख्यमंत्री काय म्हणाले…

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमान घराघरात होतंय. दोन वर्षापासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालंय. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करुया. गणपती देवता आपल्या सर्वांच्या आय़ुष्यात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी करतो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करुयात. सर्व एकजुटीने प्रयत्न करुयात….

हे सुद्धा वाचा

‘महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प’

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करावी,असं आवाहन मी गणेशभक्तांना करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा दृढ संकल्प मी केलाय. तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे. कोरोनामुळे मंदावलेली विकासाची गती पुन्हा गाठायची आहे. कितीही आव्हानं आली तरी तमा बाळगायची नाही. मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत, हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करुयात, गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा….

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.