भाजप, शिंदे गट, मनसे युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य; महायुती होणार?
सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होणार का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी मनसे (MNS), भाजप (BJP) आणि शिंदे गटाची युती होणार का? यावर शिंदे गट, मनसे आणि भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र आता याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक असं विधान केलं आहे. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य अनौपचारिक गप्पांवेळी केलं आहे.
महायुतीच्या चर्चेला उधाण
महापालिका निवडणुकांसाठी मनसे. शिंदे गट आणि भाजपाची युती होणार असा अंदाज बांधला जात आहे. याबाबत शिंदे, गट, मनसे आणि भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दिपोत्सव या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील तीन मोठे नेते एकत्र दिसले होते. तेव्हापासून महायुतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची महायुती होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
मनसेची सावध भूमिका
मात्र दुसरीकडे महायुतीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. युतीबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरे हे घेतील. त्यांनी जर आदेश दिला तर आम्ही युती करण्यास तयार आहोत असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.