Sharad Pawar : एकनाथ शिंदेंकडं मुख्यमंत्रीपद देणं हाच एकमेव पर्याय, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष यांनी शरद पवारांनी शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिल्याची कळतंय.
मुंबई : आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष यांनी शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिल्याची कळतंय. खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिलीय. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांचा हा सल्ला (Sharad Pawar Suggestion) पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर झालेल्या संवादात दिल्याची माहिती मिळत आहे. आता पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात एक बैठक सुरु आहे. त्या बैठकीत हा सल्ला दिला गेलेला नाही.
उद्धव ठाकरे, शरद पवारांची बैठक सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. या बैठकीत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होणार? पवार मुख्यमंत्र्यांना आता कोणता सल्ला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं, उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन
ठाकरे म्हणाले की, आज मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.
एकूण 56 | शिवसेना आमदार | मतदारसंघ |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
3 | चिमणराव पाटील | एरंडोल |
4 | किशोर पाटील | पाचोरा |
5 | संजय गायकवाड | बुलडाणा |
6 | संजय रायमुलकर | मेहेकर |
7 | नितीनकुमार तळे | बाळापूर |
8 | संजय राठोड | दिग्रस |
9 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
10 | संतोष बांगर | कळमनुरी |
11 | राहुल पाटील | परभणी |
12 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
13 | प्रदीप जैसवाल | औरंगाबाद मध्य |
14 | संजय शिरसाठ | औरंगाबाद पश्चिम |
15 | संदीपान भुमरे | पैठण |
16 | रमेश बोरनारे | वैजापूर |
17 | सुहास कांदे | नांदगाव |
18 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
19 | श्रीनिवास वनगा | पालघर |
20 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
21 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
22 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
23 | लताबाई सोनावणे | चोपडा |
24 | प्रकाश सुर्वे | मागाठणे |
25 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
26 | सुनील राऊत | विक्रोळ |
27 | रमेश कोरगांवकर | भांडुप पश्चिम |
28 | रविंद्र वायकर | जोगेश्वरी पूर्व |
29 | सुनील प्रभू | दिंडोशी |
30 | दिवंगत रमेश लटके | अंधेरी पूर्व |
31 | दिलीप लांडे | चांदिवली |
32 | प्रकाश फातर्पेकर | चेंबुर |
33 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
34 | संजय पोतनीस | कलिना |
35 | सदा सरवणकर | माहिम |
36 | आदित्य ठाकरे | वरळी |
37 | अजय चौधरी | शिवडी |
38 | यामिनी जाधव | भायखळा |
39 | महेंद्र थोरवे | कर्जत |
40 | महेंद्र दळवी | अलिबाग |
41 | भरत गोगावले | महाड |
42 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
43 | कैलास पाटील | उस्मानाबाद |
44 | तानाजी सावंत | परांडा |
45 | शाहजी बापू पाटील | सांगोला |
46 | शंभूराजे देसाई | पाटण |
47 | योगेश कदम | दापोली |
48 | भास्कर जाधव | गुहागर |
49 | उदय सामंत | रत्नागिरी |
50 | राजन साळवी | राजापूर |
51 | वैभव नाईक | कुडाळ |
52 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
53 | प्रकाश आबीटकर | राधानगरी |
54 | अनिल बाबर | खानापूर |
55 | सुजित मिंचेकर | हातकणंगले |
56 | उद्धव ठाकरे | विधान परिषद आमदार |