सभागृहात उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले, अडीच वर्षे बाहेर…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कर्मकांडांवर प्रबोधनकारांनी प्रहार केले. त्यांचे वारसदार लिंबू-टिंबूची भाषा करू लागले. कुठं चाललोय आपण.

सभागृहात उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले, अडीच वर्षे बाहेर...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 10:31 PM

नागपूर : मुख्यमंत्री रमले शेतीत. व्हिडीओ पाहिलात का. शेतात हेलिकॅप्टरनं जाणारा मुख्यमंत्री दाखवा नि एक लाख रुपये मिळवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री हेलिकॅप्टरनं शेतात कसा जातो म्हणून मला हिनवण्यात आलं. एक लाख रुपये बक्षीस लावलं. मग मी म्हणतो, अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा नि बक्षीस मिळवा. पण, लोकांचे बक्षीस वाचवावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीचं बदलविला.

उद्धव ठाकरे यांनी कोत्या मनोवृत्तीचं लक्षण सांगितलं होतं. ज्याला स्वतःची कुवत नसते ते पक्ष चोर, वडील चोर, कार्यालयावर ताबा घे, अशी काम करतात. ते आज आरएसएसला जाऊन आले उद्या ते कदाचित त्यांच्या कार्यालयावर हक्क सांगतील, असा टोला लगावला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कर्मकांडांवर प्रबोधनकारांनी प्रहार केले. त्यांचे वारसदार लिंबू-टिंबूची भाषा करू लागले. कुठं चाललोय आपण.

वर्षावर गेलो तेव्हा तिथं पाटीभर लिंब सापडलेत. लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधात बोलल्या बोलल्या त्यांच्या घरी बुलडोजर जायचं. त्याला जेलमध्ये टाकायचे. कंगणा राणावतचं घर तुटावं म्हणून वकिलाला ८० लाख रुपये दिले होते. लोकांचे पैसे वकिलाला देण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.

तिकडं हनुमान चालिका बसलाय. त्याला जेलमध्ये टाकलं. त्यांनी पत्नी खासदार यांना हनुमान चालिसा वाचलं म्हणून तेरा दिवस जेलमध्ये टाकलं असल्याचा प्रहारही एकनाथ शिंदे यांनी केला. कुणाला टाकलं जेलमध्ये खासदार महिलेला. रवीला टाकलं असतं ठिक आहे. आपण जेलमध्ये जाणारे लोकं आहोत. असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.