मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, संदीप देशपांडेंकडून खिल्ली

मनसे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा संदीप देशपांडे यांनी केली.

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, संदीप देशपांडेंकडून खिल्ली
उद्धव ठाकरे, संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 3:44 PM

नाशिक : “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशाचं नेतृत्व करावं असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात. पण राऊत काहीही बोलतात. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार?” अशी खिल्ली मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उडवली. ते नाशिकमध्ये बोलत होते. मनसे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Election) लढणार असल्याची घोषणा संदीप देशपांडे यांनी केली.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी खिल्ली उडवली. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी निशाणा साधला.

सध्या संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे, संदीप देशपांडेंनी नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजकारण बाजूला ठेवा 

संदीप देशपांडे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून, नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे. मनसे काळातील प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करावी. तशी मागणी नाशिक महापालिका आयुक्तांना केली आहे”.

पालिकेच्या इंजिनिअर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही, तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. मनसेने उभारलेले प्रकल्प सत्ताधारी भाजप स्मार्ट सिटी म्हणून दाखवते आहे. मनसेच्या कामावर भाजप पोळी भाजप आहे, असा आरोप त्यांनी केला. कामगारांना कोविड भत्ता मिळायला हवा. कालिदास रंगमंदिरात कलाकारांना दुय्यम वागणूक मिळते. आयुक्तांना या सर्व गोष्टींचा इशारा दिलाय.

अमित ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दिवसभरात अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बोटॅनिकल गार्डनचा समावेश होता. याशिवाय, अमित ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देतील.

अमित ठाकरेंवर नाशिक महापालिका जबाबदारी

अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस; पालिका आयुक्तांना भेटणार

नाशिक महापालिकेसाठी मनसेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंचा वन-टू-वन संवाद, मनसैनिकांमध्ये उत्साह

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.