मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief minister Uddhav Thackeray) हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जव्हारमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पालघर हा नव्यानं झालेला जिल्हा आहे. तिथल्या सुविधांची मुख्यमंत्र्यांनी पहाणी केली. याच दरम्यान पत्रकारांशी बोलताना ते बंद दाराआडच्या चर्चेवर आले. (Chief minister Uddhav Thackeray on secret talk)
बंद दाराआडच्या चर्चेवर बोलू द्या जव्हारमध्ये मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक पत्रकार स्थानिक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना बोलतं करत होते. त्याच वेळेस एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख केला. खरं तर मुख्यमंत्र्यांना भाजपच्या कुठल्याही टिकेला उत्तर द्यायचं नव्हतं असंच दिसलं. प्रश्नही तसे विचारले जात नव्हते. पण बोलता बोलता त्यांच्या तोंडी बंदी दाराआडची चर्चा आली अन् खुद्द मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणासाठी बदलले. पत्रकार बंद दाराआडच्या चर्चेच्या शब्दावरुन पुढं गेले होते पण तरीही मुख्यमंत्र्यांनी, थांबा मला थोडं बंद दाराआडच्या चर्चेवर बोलू द्या म्हणत, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचा त्यांनी तपशिल दिला.
काय आहे बंद दाराआडच्या चर्चेचा संदर्भ भाजपाचे नेते अमित शाह गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख केला होता. मातोश्रीवर शाह आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाली होती असा दावा आतापर्यंत उद्धव ठाकरे करत आले आहेत. त्यात भाजपानं मुख्यमंत्रीपद मान्य केलं होतं असा दावाही सेना करते. पण बंद दाराआड असा कुठलाही शब्द उद्धव ठाकरेंना दिला नव्हता असं स्पष्टीकरण खुद्द अमित शाहांनी सिंधुदुर्गातल्या भाषणात दिला. त्याच बंद दाराआडच्या चर्चेवरुन भाजप आणि सेनेत वाद झालेला आहे.
आणि अमित शाहांच्या टिकेवर बोलणं उद्धवनी टाळलंअमित शाहांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही आतापर्यंत बोललेला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे गेले. साहजिक आहे त्यांना अमित शाहांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला जाणार. एका पत्रकारांनं तो प्रश्न विचारलाही पण, इथल्या प्रश्नावर बोलू म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांचा सिंधुदुर्ग दौरा आणि त्यातल्या टिकाटिप्पणीवर बोलणं टाळलं.
इतर बातम्या :
संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच त्यांनी ठरवलंय?, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
(Chief minister Uddhav Thackeray on secret talk)