आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर (Bjp) घणाघात केला आहे. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे आम्ही हिंदुत्त्वाला सोडले असे होत नाही. रामाचा जन्म झाला नसता तर यांचं राजकारण कस चाललं असत.? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही खोटं बोलण्यात कमी पडलो, खोटं बोल पण रेटून बोल ही शिवसेनेची संस्कृती नाही, अनेक जण खोट आणि रेटून बोलतात यावरच तर त्यांचे राजकारण सुरू आहे. असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजप म्हणते आम्हाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल आदर आहे, मग माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत आम्हाला दिलेला शद्ब का मोडला, आम्ही बाळासाहेबांच्या खोलीला मंदिर मानतो, मात्र त्या मंदिरता भाजपाने दिलेला शद्ब पाळला नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला, खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपाची संस्कृती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही खोट बोलण्यात कमी पडलो, मात्र खोट बोलणं शिवसेनेच्या रक्तात नाही. आम्ही जे करतो ते लपून छपून नाही तर समोरासमोर करतो. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही. काहींनी जाणून बूजून खोटा प्रचार करून समाजात दरी निर्माण करण्याची सवय असते. राम जन्मला नसता तर भाजपाचे राजकारण झाले नसते अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
एकीकडे भाजप म्हणते आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो, मग माझा त्यांना सवाल आहे की? तुम्ही बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शद्ब का मोडला. आम्ही बाळासाहेबांच्या खोलीला मंदिर मानतो, याच मंदिरात युती संदर्भात बोलणे झाले होते, मग तुम्ही तुमचा शद्ब का मोडला. तुम्हाला जर बाळासाहेबांबद्दल आदर आहे, तर समृद्धी महामार्गाला त्यांचे नाव देण्यास भाजप का विरोध करत आहे. शिवसेना काँग्रेसला मतदान करणार का तर नक्की करणार काँग्रेसला मतदान करण पाप असेल तर मेहबुबा मुफ्ती वेळी काय झालं होतं असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?
MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?