CM Uddhav Thackeray : माझं मुख्यमंत्रीपद मान्य न करणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. माझं मुख्यमंत्रीपद मान्य न करणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray)आज पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. माझं मुख्यमंत्रीपद नाकारणं म्हणजे राक्षसी महत्त्वकांक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंसाठी मी काय नाही केले. नगरविकास मंत्र्यासारखे मोठे खाते दिले. माझ्याकडे असलेली दोन खाती दिली. तसेच संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र मी त्यांना सांभाळून घेतले. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता त्यांनी जगून दाखवावे असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे नेमंक काय म्हणाले?
माझं मुख्यमंत्रीपद नाकारणं म्हणजे राक्षसी महत्त्वकांक्षा आहे, झाडाची फुलं नेता येतील, फळे नेता येतील, फाद्यांही नेता येतील मात्र तुम्ही त्याची मुळ कशी नेणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. मी बंडखोरांसाठी काय नाही केले? एकनाथ शिंदे यांना नगरविकासासारखे मोठे खाते दिले. माझ्याकडील दोन खाती दिली. मग ही नाराजी कशासाठी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बंडखोर आमदारांबाबत बोलताना ते म्हणाले की, मी बंडखोर आमदारांसाठी काय नाही केलं, संजय राठोड यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते, मात्र मी त्यांना सांभाळून घेतले. माझ्यापेक्षा बाळासाहेबांचे दुसरे प्रिय आपत्य म्हणजे शिवसेना हे आहे. जे लोक म्हणत होते आम्ही शिवसेनेसाठी जीव देऊ, तेच लोक आज पळून गेल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
शिवसेनेचे नाव न वापरता जगून दाखवा
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली आहे. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेकडून या आमदारांची मनधरणी करणे सुरू आहे, मात्र त्यात काही यश आलेले नाही. आज उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला त्यांवेळी शिवसेनेचं नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना केले आहे.