Adbul Sattar : मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्रीच राहणार केंद्रस्थानी, सत्तारांनी सांगितला शिंदे अन् उद्धव ठाकरेंमधील फरक
मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता जोमात वाहू लागले आहे. शिवसेनेबरोबरच आता भाजपा आणि शिंदे गटाचीही या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. एकीकडे मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर असणार असे ठणकावून सांगत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार आता शिंदे गटही ताकदीने लढणार असल्याचे सांगत आहे.
यवतमाळ : दहीहंडी उत्सवामधून (Municipal Election) महापालिका निवडणुकीते रणशिंग फुंकले गेले आहे. शिवाय मुंबई येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पार पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महापालिकेवर आता (BJP Party) भाजपचाच महापौर असणार हे ठणकावून सांगितले जात आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र, शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकांमध्ये (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच केंद्रस्थानी राहणार असल्याचे सांगत आहेत. याबाततीत अब्दुल सत्तार यांनी तर स्पष्टच सांगितले आहे. शिंदे हे केंद्रस्थानी असणार आहेतच पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असून त्याचा फायदा शिंदे गटालाच होईल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सत्तार हे विदर्भातील पीक पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. शिवाय आगामी आठवड्यात मदतनिधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही सत्तार म्हणाले आहेत.
काय आहे ठाकरे अन् शिंदेमध्ये फरक?
बहुमत मध्ये मुंबई महापालिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजप शिवसेना च्या ताब्यात राहील असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे. उद्धवजी जे काही बोलतात करतात त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्ते मध्ये राहणारा नेता आहे.म्हणून याचे परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणूक मध्ये दोघांचा फरक पाहून जनता निश्चित एकनाथ शिंदे वर विश्वास ठेवेल असा निर्धार सत्तार यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका चा रिमोट हा सुद्धा भाजप आणि एकनाथ शिंदे च्या हातात राहील आणि तसच पुढच्या निवडणूक मध्ये होतील एकनाथ शिंदे नवीन शक्ती घेऊन राहतील असेही सत्तार म्हणाले आहेत.
शिंदे गटही ताकदीने लढणार
मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता जोमात वाहू लागले आहे. शिवसेनेबरोबरच आता भाजपा आणि शिंदे गटाचीही या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. एकीकडे मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर असणार असे ठणकावून सांगत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार आता शिंदे गटही ताकदीने लढणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे काळाच्या ओघात निवडणुकांची गणिते कशी बदलतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अद्यापही निवडणुक कार्यक्रम समोर आला नसला तरी प्रमुख पक्ष हे कामाला लागले आहेत.
कृषीमंत्र्यांनी घेतला पिठलं भाकरीचा स्वाद
यवतमाळ जिल्ह्यातील पूर नुकसानीची पाहणी दौऱ्यावर आलेल्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उमरखेड तालुक्यातील वरुड बीबी या ठिकाणी शेतकरी शेतमजूर सोबत बसून बेसन भाकरी आस्वाद घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा संपविला याठिकाण हुन सत्तार हे नांदेड कडे रवाना झाले. दरम्यान, दोन दिवस त्यांनी पिकांची पाहणी तर केलीच पण शेतकऱ्यांशी संवादही साधला होता. नुकासनीची पाहणी करुन पुढच्या आठवड्यात मदतनिधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले आहे.