चीनची 10 हजार भारतीयांवर पाळत, आजी-माजी 5 पंतप्रधान, 12 मुख्यमंत्री, 350 खासदारांचा समावेश
भारत-चीन सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनने आता देशांतर्गत हेरगिरी करण्यासही सुरुवात केल्याची माहिती समोर आलं आहे (China spying of 10 thousand people of India including PM).
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनने आता देशांतर्गत हेरगिरी करण्यासही सुरुवात केल्याची माहिती समोर आलं आहे (China spying of 10 thousand people of India including PM). इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यामुळे सीमेवर तणाव निर्माण करत असतानाच चीनकडून सायबर युद्धाची तयारी सुरु असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. चीनच्या एका कंपनीने जवळपास 10 हजार भारतीयांवर नजर ठेवत त्यांची माहिती चोरल्याचं या अहवालातून समोर आलंय. यात 5 आजी-माजी पंतप्रधान, राष्ट्रपती, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, सैन्यदल प्रमुख यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
चीनची ही कंपनी भारतातील जवळपास 10 हजार महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेऊन आहे. ही कंपनी चीन सरकारशी संबंधित आहे. या माहितीला ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डेटाबेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत परदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात येते.
5 आजी-माजी पंतप्रधान, 12 मुख्यमंत्र्यांचा यादीत समावेश
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “चीन भारताच्या एक आजी पंतप्रधान आणि 4 माजी पंतप्रधानांवर नजर ठेऊन आहे. तसेच 12 मुख्यमंत्री, विविध पक्षांचे 350 खासदार यांच्यासह अनेकांवर पाळत ठेऊन आहे. या सर्व व्यक्तींच्या छोट्यात छोट्या गोष्टींची चीन माहिती गोळ करत आहेत. या कंपनीकडून देशातील 1 हजार 350 राजकीय व्यक्तींवर नजर ठेवण्यात येत आहे. यात अगदी सरपंचांपासून महापौर, आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे. यात भाजप, काँग्रेस, डावे यांच्यासह प्रादेशिक पक्षांच्या लोकांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरपासून तर अगदी तामिळनाडु, ओडिशापासून महाराष्ट्रापर्यंत सर्व ठिकाणांचा समावेश आहे.
राजकीय कुटुंबांवरही चीनची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्कर प्रमुख, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांच्यासह गांधी कुटुंब, शिंदे कुटुंब, पवार कुटुंब, बादल कुटुंब अशा राजकीय कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनी, अनुपम खेर, मुनमुन सेन, परेश रावल इत्यादींप्रमाणे बॉलिवूडमधील कलाकार जे नंतर राजकारणात आले त्यांचाही या यादीत समावेश आहे.
या वृत्ताप्रमाणेच संरक्षण आणि सायबर तज्ज्ञही सायबर युद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत. यात संबंधित व्यक्तिंच्या घरातील सदस्य, त्यांच्या संस्थांविषयी सर्व माहिती गोळा केली जात आहे.
संबंधित बातम्या :
डोनाल्ड ट्रम्प आक्रमक, अमेरिकन सैन्याच्या हालचालींनी चिनी समुद्रात खळबळ
सीमेवरील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही, मॉस्कोतील बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट इशारा
अडीच महिन्यात भारताने चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं, जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज
संबंधित व्हिडीओ :
China spying of 10 thousand people of India including PM