चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर

सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे, असा टोला अरविंद सावंत यांना राणेंना लगावलाय.

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर
नारायण राणे, अरविंद सावंत
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 7:42 PM

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. तर राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (MP Arvind Sawant’s reply to Union Minister Narayan Rane’s criticism)

सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

राणेंची शिवसेनेवर टीका

नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले.

दरेकरांचीही सरकारवर टीका

चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चिपीच्या लोकार्पण सोहळ्यावरून मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या :

आयकर विभागाच्या छाप्यांबाबत खुलासा करा, भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान

‘मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता’, अजितदादांचा शिवतारेंना खोचक टोला

MP Arvind Sawant’s reply to Union Minister Narayan Rane’s criticism

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.