Chitra Wagh : काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं? चित्रा वाघांनी नाना पटोलेंना डिवचलं, पाहा VIDEO

ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. तर हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपाचे (BJP) कटकारस्थान असल्याचे नाना पटोले यांचे म्हणणे आहे.

Chitra Wagh : काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं? चित्रा वाघांनी नाना पटोलेंना डिवचलं, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 5:56 PM

मुंबई : काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका महिलेसोबत आहेत. हाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी आता ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. दुसरीकडे खासगी व्हिडिओ शेअर केल्याने चित्रा वाघ यांच्यावरही टीका होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपाचे (BJP) कटकारस्थान असल्याचे नाना पटोले यांचे म्हणणे आहे. तर नाना पटोलेंचा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मला धक्का बसला, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

ch

नाना पटोलेंचा व्हायरल व्हिडिओ चित्रा वाघ यांच्याकडून ट्विट

चेरापुंजीतील व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नेटकऱ्यांनी आज ट्रोल केले आहे. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काम करणाऱ्याची बदनामी करण्याचे षडयंत्र

नाना पटोले सध्या पूरग्रस्त भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अशातच त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपाची रणनीती आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले. दरम्यान, नाना पटोलेंना याची उत्तरे द्यावी लागतील, असे पत्रकार परिषदेच चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे.

टीप – व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत टीव्ही 9 खात्री देत नाही.

2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.